शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरुन क्रिकेटरनं घेतली पॉप स्टार गायिकेची फिरकी 

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 3 February 2021

रिहाना आपल्या पॉप सिंगगमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. ट्विटरवर तिचा फॅन फॉलोवर्सचा आकड़ा हा 10 कोटीच्या घरात आहे.

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात मागील दोन महिन्यांपासून देशातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. सरकार आणि शेतकरी नेते यांच्यातील बैठका निष्फळ ठरत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरुन शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या पंतप्रधानांपासून ते कॅनडातून शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. पंजाबमधील काही प्रसिद्ध कलाकारांनी देखील शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले आहे. यात आता आंतरराष्ट्रीय कलाकाराची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिने सोशल मीडियावरुन शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.  

रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केले आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा फोटो शेअर करत तिने लिहिलंय की आपण या मुद्यावर चर्चा का करत नाही? या प्रश्नार्थक वाक्यासह तिने #FarmersProtest हॅशटगही वापरला आहे. तिच्या या ट्विटर काहीजण तिचे कौतुक करत आहेत. तर काहींनी तिला सुनावलेही आहे. यात भारतीय संघाचा क्रिकेटरचाही समावेश आहे. 

प्रग्यान ओझाने तिच्या ट्विटवर रिप्लाय देताना लिहिलंय की, शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल याचा विश्वास आहे. देशाच्या अंतर्गत मुद्यावर बाहेरच्यांनी बोलण्याची गरज नाही. देशाला शेतकऱ्यांचा अभिमान आहे त्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असा रिप्लाय ओझाने रिहानाच्या ट्विटवर दिला आहे. 

तेव्हा मला राहुलभाईने कॉल केला आणि... 'अजिंक्य' यशात 'मिस्टर रिलायबल'चा हात

रिहाना आपल्या पॉप सिंगगमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. ट्विटरवर तिचा फॅन फॉलोवर्सचा आकड़ा हा 10 कोटीच्या घरात आहे. कलेसोबतच सामाजिक मुद्यावर रिहाना अनेकदा व्यक्त होत असते. ओझासह अन्य काही नेटकऱ्यांनी तिला खोचकपद्धतीने टोला लगावला असला तरी मोठ्या प्रमाणात तिच्या भूमिकेचे लोक कौतुकही करत आहेत.


​ ​

संबंधित बातम्या