कतारला 2030 व रियाधला 2034 च्या आशियाई स्पर्धेचे यजमानपद   

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 16 December 2020

आशियाई खेळ स्पर्धेचे 2030 मधील आयोजन कतारची राजधानी दोहा येथे होणार आहे. तर याच्या चार वर्षानंतर 2034 मधील स्पर्धांचे आयोजन रियाधमध्ये होणार आहे.

आशियाई खेळ स्पर्धेचे 2030 मधील आयोजन कतारची राजधानी दोहा येथे होणार आहे. तर याच्या चार वर्षानंतर 2034 मधील स्पर्धांचे आयोजन रियाधमध्ये होणार आहे. या दोन्ही प्रतिस्पर्धी देशांमधील झालेल्या करारानंतर आज हा निर्णय घेण्यात आला. यासाठी आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या (ओसीए) जनरल असेंब्लीमध्ये मतदान घेण्यात आले. त्यामुळे सौदी अरेबिया आणि कतार यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर हे मतदान पार पडले. 

फ्लायड मेवेदर व लैला अली यांचा बॉक्सिंगच्या 'हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश...

सौदी अरेबियाने 2017 मध्ये कतार सोबत व्यापार आणि प्रवासासंबंधित अनेक गोष्टीत बहिष्कार टाकला होता. मात्र त्यानंतर आता दोन्ही देशातील वाद संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ओसीएने घेतलेल्या मतदानानंतर 2030 मधील आशियाई स्पर्धेचे नियोजन कतारला आणि 2034 मधील स्पर्धेचे नियोजन रियाधला देण्याची घोषणा करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या समस्येमुळे बुधवारी झालेल्या मतदानात सतत विलंब होत होता. कारण कोरोना विषाणूच्या साथीमुळे बरेच प्रतिनिधी आपापल्या देशातून मतदान करीत होते. तर यावेळेस 26 प्रतिनिधींना बॅलेट पेपर देण्यात आले होते. आणि 19 प्रतिनिधींनी इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे स्वत: च्या क्षेत्रातून मतदान केले. 

यानंतर ओसीएचे अध्यक्ष शेख अहमद अल फहद अल सबाह यांनी या मतदानामुळे कोणीही विजेता आणि पराभूत झाले नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी या करारासाठी सौदी अरेबिया आणि कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांचे आणि परिषदेचे यजमान ओमान यांचे आभार मानले. त्यामुळे आता कतार 2022 मध्ये फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे देखील आयोजन आणि 2030 मध्ये आशियाई स्पर्धेचे आयोजन करणार आहे.          


​ ​

संबंधित बातम्या