विश्‍वकरंडक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात राहुल आवारे 

संजय घारपुरे
Thursday, 3 December 2020

महाराष्ट्राच्या राहुल आवारेची बेलग्रेड विश्‍वकरंडक वैयक्तिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राहुल आवारेची बेलग्रेड विश्‍वकरंडक वैयक्तिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेद्वारे कोरोना आक्रमणानंतर प्रथमच भारतीय संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन करणार आहे. 

चॅम्पियन्स लीग : ख्रिस्तियानो रोनाल्डोचे साडेसातशे गोल पूर्ण 

बेलग्रेड स्पर्धेसाठी 24 कुस्तीगीरांसह नऊ मार्गदर्शक, तीन सपोर्ट स्टाफ तसेच तीन रेफरींची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी एकंदर 90 लाख रुपये खर्च होणार आहे. तो केंद्र सरकार करणार आहे. 

भारतीय संघ - 
पुरुष, फ्रीस्टाईल : रवी कुमार (57 किलो), राहुल आवारे (61), नवीन (70), गौरव बलियन (79), दीपक पुनिया (86), सत्यव्रत काडियन (97), सुमीत (125). 

ग्रीको रोमन : अर्जुन हालाकुर्की (55), ग्यानेंदर (60), सचिन राणा (63),आशू (67), आदित्य कुंडू (72), साजन (77), सुनील कुमार (87), हरदीप (97), नवीन (130). 

महिला : निर्मला देवी (50), पिंकी (55), आंशू (57), सरीता (59), सोनम (62), साक्षी मलिक (65), गुरशरण प्रीत कौर (72), किरण (76). 


​ ​

संबंधित बातम्या