भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे. कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच विलगीकरणात आहेत. मागील आठवड्यात ताप आल्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली होती. व या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

कोरोनामुळे एफआयएच प्रो लीगचे सामने स्थगित  

गेल्या आठवड्यात ताप आला होता आणि कोरोना तपासणी केली होती असे राजीव मेहता यांनी काल पीटीआयला सांगितले. तसेच या चाचणीचा रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले असून, ते दिल्लीस्थित आपल्या निवासस्थानीच विलगीकरणात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

रोहितचा दावा, मी पूर्णपणे तंदुरुस्त

दरम्यान, भारतात एकाच दिवसात कोरोनाचे 46,253 नवीन रुग्ण नोंदले गेले असून, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या  83 लाख झाली आहे. तर 76.56 लाख रुग्ण ठीक झाले आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या