SakalSportsToday 16-12-2020 : खेळ जगतातील अन्य प्रमुख घडामोडी  

संजय घारपुरे
Wednesday, 16 December 2020

लिओनेल मेस्सी बार्सिलोनाकडेच राहणार; नेमारही परत येणार

बॉक्‍सिंग वाचवण्याचे पंतप्रधानांना आवाहन 

सुरेश रैना उत्तर प्रदेशकडून खेळणार 

महिला चॅम्पियन्स लीगमध्ये लिऑनचा विजय  

लिओनेल मेस्सी बार्सिलोनाकडेच राहणार; नेमारही परत येणार 
लिओनेल मेस्सी बार्सिलोना संघात कायम राहील; एवढेच नव्हे, तर नेमारही संघात परत येईल, असे बार्सिलोना क्‍लबच्या अध्यक्षपदाचे उमेदवार जॉर्डी फॅरे यांनी सांगितले. मेस्सीच्या विरोधात असलेले क्‍लबचे माजी प्रमुख जोसेप मारिया यांच्याविरोधात फॅरे यांनीच जोरदार मोहीम उघडली होती. त्यांनी आपल्याला पाठिंबा देणाऱ्या क्‍लबच्या मतदारांना मोफत टॅटू तसेच पिझ्झा देण्याची ग्वाही दिली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यावर काही दिवसांतच बार्सिलोना आणि मेस्सी यांच्यात नवा करार होणार आहे, असे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर मेस्सीही यासाठी तयार असल्याचा दावा त्यांनी केली. क्‍लबची आर्थिक स्थिती सुधारणे शक्‍य आहे. नेमारला संघात परत आणल्यास क्‍लबची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल, असेही त्यांनी सांगितले. 

AUSvsIND : जाणून घ्या कोणते नवे रेकॉर्डस् होऊ शकतात उद्याच्या सामन्यात 

बॉक्‍सिंग वाचवण्याचे पंतप्रधानांना आवाहन 
केंद्रीय क्रीडा खात्याने भारतीय बॉक्‍सिंग महासंघाची संलग्नता कायम ठेवण्यासाठी बॉक्‍सर मनोज कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बॉक्‍सिंग महासंघाची निवडणूक 31 डिसेंबपर्यंत घेणे बंधनकारक आहे; पण महासंघाने या महिन्यातील निवडणूक लांबणीवर टाकली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार महासंघाच्या अध्यक्षांना नसतो, असेही मनोज कुमार यांनी म्हटले आहे. 

''विराट कोहलीसाठी बऱ्याच योजना आखल्या आहेत'' 

सुरेश रैना उत्तर प्रदेशकडून खेळणार 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतलेल्या सुरेश रैनाने मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धा खेळण्याचे ठरवले आहे. तो उत्तर प्रदेशकडून खेळणार आहे. आयपीएल खेळण्याच्या उद्देशाने त्याने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी अमीरातीत झालेल्या आयपीएलच्या वेळी तो स्पर्धा सुरू होण्यास काही दिवस असताना भारतात परतला होता. 

AUSvsIND : पिंक बॉल सामन्यासाठी विराट सेनेची घोषणा 

महिला चॅम्पियन्स लीगमध्ये लिऑनचा विजय 
सात वेळच्या विजेत्या लिऑनने चॅम्पियन्स महिला फुटबॉल लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी युव्हेंटिसचा परतीच्या लढतीत 3-0 असा पराभव करताना एकंदरीत 6-2 वर्चस्व राखले. अवे लढतीतील 3-2 असा निसटच्या विजयानंतर लिऑनने घरच्या मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना फारशी संधी दिली नाही.


​ ​

संबंधित बातम्या