Table Tennis : नाशिकची सायली राष्ट्रीय विजेती

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 2 March 2021

मुंबई : राज्य चाचणी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराजित झालेल्या सायली वाणी हिने राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत किशोरी गटात विजेतेपद जिंकले. तिने गतविजेती पृथा वर्टीकर आणि संभाव्य विजेती सुहाना सैनी यांना हरवून हे यश मिळवले.15 वर्षीय सायलीला मुंबईतील राज्य स्पर्धेत तिसरे मानांकन होते, पण त्यानंतरही तिला उपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक हार पत्करावी लागली होती, पण या वेळी कोणतेही दडपण न घेता त्याच वेळी प्रतिस्पर्ध्यावरील दडपणाचा पुरेपूर फायदा घेत सायलीने विजेतेपद पटकावले. 

आफ्रिदीचा वय लपवाछपवीचा खेळ; 16 व्या वर्षी शतक झळकावल्याचा खोटेपणा उघड

तिने अंतिम लढतीत 4-3 म्हणजेच 11-8, 7-11, 14-12, 5-11, 8-11, 11-7, 12-10 असा विजय मिळवला. या स्पर्धेत पात्रता फेरीपासून सुरुवात करणे भाग पडलेल्या सायलीने राज्य तसेच गतविजेत्या पृथाला उपांत्य फेरीत सरळ चार गेममध्ये हरवले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या तिघींनी उपांत्य फेरी गाठली होती.

राज्य स्पर्धेच्या वेळी खूपच दडपण घेतले होते. या गटातील ही अखेरची स्पर्धा असल्यामुळे विजेतेपदासाठी आतुर होते. त्याचा परिणाम कामगिरीवर झाला. या वेळी दडपण घेतले नाही. या स्पर्धेत जिंकायचेच असा विचार केला नाही, या वेळी चांगल्या खेळावर लक्ष केंद्रित केले.
- सायली वाणी

​ ​

संबंधित बातम्या