मरियप्पनसह सहा भारतीय खेळाडूंचे विलगीकरण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 August 2021

पॅरालिंपिक स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यात दोन वेळा सुवर्णपदक जिंकणारा मरियप्पन थंगावेलू भारताचा ध्वजधारक असणार होता, परंतु ऐनवेळी यात बदल करण्यात आला आणि त्याच्या जागी तेक चंदने भारतीय पथकाचे नेतृत्व केले.

टोकियो - पॅरालिंपिक स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यात दोन वेळा सुवर्णपदक जिंकणारा मरियप्पन थंगावेलू भारताचा ध्वजधारक असणार होता, परंतु ऐनवेळी यात बदल करण्यात आला आणि त्याच्या जागी तेक चंदने भारतीय पथकाचे नेतृत्व केले.

ज्या कारणामुळे हा बदल झाला ते कारण भारतीय संघासाठी काहीसे चिंता करणारे आहे. मरियप्पनसह सहा खेळाडूंचे सावधगिरी म्हणून विलगीकरण करण्यात आले.

मरियप्पन आणि हे इतर पाच खेळाडू ज्या विमानातून टोकियोला गेले, त्यातील एका परदेशी प्रवाशाला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे आणि हे भारतीय त्याच्या संपर्कात आले होते. म्हणून या सहाही जणांचे तातडीने विलगीकरण करण्यात आले.

मरियप्पनने आतापर्यंत दोन पॅरालिंपिक स्पर्धांत सुवर्णपदके जिंकलेली आहेत. यंदाही त्याच्याकडून पदकाची आशा आहे. मरियप्पन आणि इतर पाच जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात ते सर्व निगेटिव्ह आहेत.

पॅरालिंपिकमध्ये आज भारत
सकाळी ७.३० - टेबल टेनिस (महिला एकेरी) - सोनल पटेल
सकाळी ८.५० - टेबल टेनिस (महिला एकेरी) - भाविना पटेल


​ ​

संबंधित बातम्या