सानियाचं नशीब चांगल; पाकचा माजी कॅप्टन शोएब मोठ्या अपघातातून बचावला (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

कार तो स्वत:च चालवत होता. नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगाने असलेली कार ट्रॅकखाली घुसली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्याला सुखरुप बाहेर काढले. कारचा चक्काचूरा झाला आहे.

लाहोर : भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकच्या कारला मोठा अपघात झाला आहे. लाहोरमध्ये झालेल्या या घटनेत शोएबची स्पोर्ट्स कार ट्रकखाली जाऊन आदळली. कारची अवस्था बिकट झाली असली तरी सुदैवाने यात शोएबला कोणतीही इजा झालेली नाही. रविवारी झालेल्या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

#BREAKING #Pakistan cricketer @realshoaibmalik car met an accident outside #National High Performance Centre, #Lahore after leaving #PSLDRAFT venue. But Alhambulillah #ShoaibMalik is safe@MirzaSania @DennisCricket_ pic.twitter.com/prCCwFuZC0

— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) January 10, 2021

पीएसएलच्या ड्राफ्ट इव्हेंट कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर शोएब आपल्या कारने घरी परतत असताना हा अपघात झाला. कार तो स्वत:च चालवत होता. नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगाने असलेली कार ट्रॅकखाली घुसली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्याला सुखरुप बाहेर काढले. कारचा चक्काचूरा झाला आहे.


​ ​

संबंधित बातम्या