Shooting World Cup : राहीचा 'चंदेरी' वेध! शूट आउटमध्ये चिंकीनं पटकावलं सुवर्ण

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 24 March 2021

चिंकी यादवने अनुभवी राही सरनोबतला मागे टाकून सुवर्ण कामगिरी केली असली तरी आनंदाची बाब म्हणजे  25 मीटर पिस्तूल प्रकारातील तीन पदके ही भारताला मिळाली आहेत.

Shooting World Cup : दिल्ली येथे सुरु असलेल्या Shooting World Cup स्पर्धेत 2021 राही सरनोबत हिने 25 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले. विशेष म्हणजे या प्रकारात चिंकी यादनवने राही आणि मनू भाकर हिला मागे टाकत सुवर्ण कामगिरी करुन लक्षवेधून घेतले.  आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणाऱ्या जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली चिंकी यादव सराव करत होती. तिने सुवर्ण कमाई करत वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या खात्यात नववे सुवर्ण जमा केले. राहिच्या रौप्य पदकासह भारताने या स्पर्धेत पाच रौप्य पदके मिळवली आहेत. तर मनू भाकरने मिळवले देशाला पाचवे कांस्य पदक मिळवून दिले.  

जोकोविचसोबत फ्लर्ट कर 51 लाख देतो; प्रसिद्ध मॉडेलला मिळाली होती ऑफर

चिंकी यादवने अनुभवी राही सरनोबत आणि मनु भाकरला मागे टाकून सुवर्ण कामगिरी केली असली तरी आनंदाची बाब म्हणजे  25 मीटर पिस्तूल प्रकारातील तीन पदके ही भारताला मिळाली आहेत.   23 वर्षीय चिंकी यादव आणि सरनोबत यांनी 32-32 असे समान अंक मिळवले होते. शूट-ऑफमध्ये चिंकीन राहीला मागे टाकले.  19 वर्षीय मनुने डॉ कर्णी सिंह शूटिंग रेंज पर 28 अंक मिळवत कांस्य पदकाची कमाई केली. तिघींनी यापूर्वीच टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे.  

2019 मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत चिंकीने दुसरे स्थान पटकावत ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. पहिल्या 20 निशाण्यानंतर 14 गुणांसह चिंकी आघाडीवर होती. मनु 13 गुणांनी दुसऱ्या स्थानावर होती. अनुभवी राहीने अखेरच्या टप्प्यात कमबॅक केले. मात्र तिला रौप्यवरच समाधान मानावे लागले.  
 


​ ​

संबंधित बातम्या