नेमबाजांचे ‘अनमास्किंग हॅपीनेस’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 March 2021

विश्‍वकरंडक नेमबाजी; आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा दुष्काळ संपल्याचा आनंद

मुंबई : जवळपास दीड वर्षानंतर भारतीय नेमबाज विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी तयार झाले आहेत. कोरोना महामारीमुळे गतवर्षीची दिल्ली विश्‍वकरंडक स्पर्धा रद्द झाली होती. आता त्याच स्पर्धेद्वारे भारतीय नेमबाजांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धा दुष्काळ संपणार आहे. या स्पर्धेपूर्वीच्या पत्रकार परिषदेच्यावेळी भारतीय नेमबाज मास्क घालून आले होते, पण स्पर्धेत अखेर खेळणार आहोत, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

दिल्ली विश्‍वकरंडक स्पर्धा रायफल, पिस्तूल आणि शॉटगन या तीनही प्रकारांत होणार आहे. डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरील या स्पर्धेत भारताचे 57 नेमबाज कसब पणास लावतील. ऑलिंपिकसाठी भारतीय नेमबाजी संघ निश्‍चित होण्यापूर्वी आपली क्षमता दाखवण्याची नेमबाजांसाठी ही चांगली संधी आहे. भारताने नेमबाजीत 15 ऑलिंपिक पात्रता मिळवल्या आहेत, पण भारतीय नेमबाजी संघटना पात्रता मिळवलेल्या नेमबाजाचीच ऑलिंपिकसाठी निवड करीत नाही. सर्वांगीण कामगिरीनुसार ही निवड करण्यात येते. यासाठी दिल्ली स्पर्धा अखेरची पात्रता निकष स्पर्धा आहे. 

धनलक्ष्मीने मोडला P.T. उषाचा विक्रम

अंगद बाजवा आणि मेईराज अहमद खान हे कैरोतील विश्‍वकरंडक शॉटगन स्पर्धेत सहभागी झाले होते, पण एअर रायफल आणि पिस्तूल नेमबाजांची ही 2019 च्या नोव्हेंबरनंतरची ही पहिलीच विश्‍वकरंडक स्पर्धा आहे. दिल्लीतील स्पर्धेत 53 देशातील 294 नेमबाज कसब पणास लावतील. 

INDvsENG ODI Squad : 'सूर्या'ची किरणं वनडेतही दिसणार; कृष्णालाही मिळाली 'प्रसिद्धी'

पहिल्या दिवशीचे भारतीय आव्हान
10 मीटर एअर रायफल पुरुष :
दिव्यांश सिंग पन्वर, अर्जुन बाबुता, दीपक कुमार. सराव स्पर्धा : पंकज कुमार आणि ऐश्वर्य सिंग तोमर

10 मीटर एअर रायफल महिला : एलावेनील वालारिवान, अंजुम मौदगिल, अपूर्वी चंडेला. सराव स्पर्धा : श्रियांका सादंगी, निशा कन्वर
(दोन्ही प्रकारातील सराव आणि प्राथमिक फेरी)


​ ​

संबंधित बातम्या