केंद्रीय मंत्र्यांनी साजरा केला शेतकऱ्याच्या 'ढिंग एक्स्प्रेस' लेकीचा बर्थडे (VIDEO)
शालेय वयापासून हिमा दासला Football मध्ये रस होता. या खेळातच तिला आपले करियअर करायचे होते.
Indian Athlete Hima Das Birthday : आसामच्या छोट्या गावात जन्मलेली आणि आपल्या धावण्याच्या गतीनं ढिंग एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय आतंरराष्ट्रीय धापपटू हिमा दासचा आज वाढदिवस. IAAF World U20 Championships मध्ये भारताला पहिले गोल्ड मेडल मिळवून देणारी आणि टोकिया ऑलिम्पिक पात्र ठरलेल्या हिमा दासच्या नावे 400 मीटरमध्ये सर्वाधिक जलद धावण्याचा विक्रम आहे. तिचा 21 वा वाढदिवस खास पद्धतीने साजरा झालाय.
याच कारण केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू हे स्वत: तिच्या वाढदिवस सेलिब्रेशनवेळी उपस्थितीत राहिल्याचे दिसले. हिमा दासने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये केक कापल्यानंतर हिमा केंद्रीय मंत्र्यांना घास भरवतानाही दिसते. हिमा दासही एका छोट्या गावातून आलेली एका शेतकरी कुटुंबियातील मुलगी आहे. तिचे वडील रंजीत दास (Ronjit Das) आणि जोनाली दास (Jonali Das) आसाममधील काइबार्टा समाजातील शेतकरी आहेत.
Thank you so much @KirenRijiju sir for the warm birthday wishes. https://t.co/Q5lELqbAv5
— Hima (mon jai) (@HimaDas8) January 9, 2021
शालेय वयापासून हिमा दासला Football मध्ये रस होता. या खेळातच तिला आपले करियअर करायचे होते. मात्र राष्ट्रीय टीममध्ये आपले भविष्य नाही हे लक्षात आल्यानंतर तिने वैयक्तिक काहीतरी करुन दाखवण्याच्या उद्देशाने धावणे हा मैदानी खेळ निवडला. ती आज ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. एवढेच नाही तिच्याकडून देशाला पदकाचीही आस आहे. फुटबॉल सोडून धावण्याच्या मैदानात जाण्यासाठी तिला लहानपणीचे कोच निपुन दास यांचे मार्गदर्शन लाभले.