योगाचा स्पर्धात्मक खेळात समावेश 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 17 December 2020

भारतीय क्रीडा मंत्रालयाने आज योगासनला एक स्पर्धात्मक खेळ म्हणून औपचारिक मान्यता दिली आहे.

भारतीय क्रीडा मंत्रालयाने आज योगासनला एक स्पर्धात्मक खेळ म्हणून औपचारिक मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे योगासन या खेळाला देखील शासकीय पाठबळ मिळू शकणार आहे. क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि आयुष मंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी योगासनला इतर खेळाप्रमाणे स्पर्धेतील खेळ म्हणून ओळखले जाणार असल्याचे सांगितले. 

Australian Open 2021 ठरलेल्या वेळेतच; वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम पक्की

योगासन हा स्पर्धात्मक खेळ असल्याचे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. परंतु याला भारत सरकारकडून मान्यता मिळणे आवश्यक होते. आणि आता मान्यता देण्यात आल्यामुळे योगासन अधिकृत आणि मान्यताप्राप्त स्पर्धात्मक खेळ होऊ शकेल, असे किरेन रिजिजू यांनी नमूद केले. यापूर्वी मागील वर्षी योग गुरु बाबा रामदेव यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशनचीही स्थापना करण्यात आली होती. व डॉ. एचआर नागेंद्र हे या फेडरेशनचे सरचिटणीस आहेत. 

इंडियन नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशनचीही स्थापना केली गेली आहे. व या फेडरेशनला गेल्या महिन्यात क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून मान्यता दिली आहे. तसेच या महासंघाला नवीन योजना आखण्यासाठी क्रिडा मंत्रालयाकडून अर्थ साहाय्य देण्यात येणार असल्याचे किरेन रिजिजू यांनी जाहीर केले आहे. याशिवाय योगासनला खेलो इंडिया कार्यक्रमाचा भाग बनविण्यात येणार असल्याचे रिजिजू म्हटले आहे. याव्यतिरिक्त, शाळा आणि विद्यापीठ यांच्यामध्ये योगासनचा समावेश करण्यात येणार असून, त्यामुळे भारतात याची लोकप्रिय वाढणार असल्याचे ते म्हणाले.    


​ ​

संबंधित बातम्या