पोलिस काकांच्या लेकीची गोल्डन कामगिरी; राष्ट्रीय स्तरावर उंचावलं साताऱ्याचं नाव

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 10 February 2021

गुवाहाटी येथे 5 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतेला सुरुवात झाली. वेगवेगळ्या 145 क्रीडा प्रकारात चार वयोगटातील 1637 मुले आणि मुलींनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.

National Junior Athletics Championships News : गुहाटी येथील राष्ट्रीय ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुदेशना शिवणकर हिने सुवर्ण कामगिरी केली आहे. 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने गोल्ड मेडल पटकावले असून 100 मीटरमध्ये तिला ब्राँझ मेडल मिळाले आहे. सुदेशनाचे वडिल हणमंत तुकाराम शिवणकर हे सातारा पोलिसात कार्यरत आहेत. लेकीनं राष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी त्यांच्यासाठीही निश्चितच अभिमानास्पद अशीच आहे.   

सुदेशना रयत शिक्षण संस्थेच्या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये बारावी सायन्समध्ये शिकत आहे. कॉलेजमधील अभ्यासासोबतच ती पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीत कसून सरावालाही वेळ काढते. बळवंत फौंडेशनचे बळवंत बाबर, कॉलेजचे प्राध्यापक जितेंद्र गुजर, स्पोर्टस डायरेक्टर गायकवाड आणि गौरव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तिने यशाला गवसणी घातली आहे. 
साताऱ्या जिल्ह्यातील मुलीनं राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशानंतर तिच्या कुटुंबियांसह कॉलेजचे नाव चर्चेत आले असून तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरु आहे. 

ISL 2021 : 22 वय.. 21 मिनिटे.. 3 गोल.. 'काश्मिरी' पंडिताची कमाल!

गुवाहाटी येथे 5 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतेला सुरुवात झाली. वेगवेगळ्या 145 क्रीडा प्रकारात चार वयोगटातील 1637 मुले आणि मुलींनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. कोरोनाच्या संकटातून सावरत असताना क्रीडा क्षेत्रातील खेळ पुन्हा सुरु होत असून ही लॉकडाऊननंतरची ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. वेगवेगळ्या राज्यातून तयारीचे स्पर्धेक स्पर्धेत आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या