आता माझी पर्स पूर्ण रिकामी आहे, त्यात पैसेच नाहीत, असे म्हणत सुशीला स्वतःवरच हसते.

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 July 2021

ऑलिंपिक क्रीडा ज्यूदो स्पर्धेत भारताचे एकमेव प्रतिनिधित्व सुशीला देवी करणार आहे. आपले ऑलिंपिक सहभागाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुशीलाने सर्वस्व पणास लावले असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

नवी दिल्ली - ऑलिंपिक क्रीडा ज्यूदो स्पर्धेत भारताचे एकमेव प्रतिनिधित्व सुशीला देवी करणार आहे. आपले ऑलिंपिक सहभागाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुशीलाने सर्वस्व पणास लावले असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

आता माझी पर्स पूर्ण रिकामी आहे. त्यात पैसेच नाहीत, असे म्हणत सुशीला स्वतःवरच हसते. माझ्याकडे जे काही होते, ते मी ज्यूदोसाठी खर्च केले. असे सांगत प्रतिथयश खेळात कारकीर्द नसेल तर खेळाडूंवर प्रतिकूल परिस्थितीस सामोरे जाण्याची वेळ येते, हेच ती सांगत असते.

तीन वर्षांपूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धा काही महिन्यांवर असताना सुशीलास जबर दुखापत झाली. तिने पुन्हा खेळण्याची आशा सोडली, तिला जीवन यांनी प्रेरित केले. मात्र ऑलिंपिक स्पर्धा सहभागासाठी निधी कमी पडू लागला. तिने तिची मारुती अल्टो कार विकली. ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत खेळण्यासाठी तसेच त्याच्या तयारीसाठी निधी कमी पडू लागला. त्यावेळी तिने आपली बचत पुंजी खर्च केली.

महामारीमुळे पूर्वतयारीवर परिणाम होत आहे हे पाहिल्यावर तिने ज्यूदोचे मॅट माजी मार्गदर्शकांकडून आणले. नवोदित ज्यूदो स्पर्धकांना आपल्यासह सराव करण्यास तयार केले. तंदुरुस्त राहण्यासाठी भल्या पहाटे उठून व्यायाम केला.

सुशीला मोठ्या अपेक्षेने ऑलिंपिक पात्रतेचा दर्जा असलेल्या आशियाई स्पर्धेस गेली, पण भारतीय पथकातील एका सदस्याला कोरोना झाल्याने संघ बाद झाला. मात्र अखेर तिला आशियाई विभागातील पात्रता देण्यात आली. 

मार्गदर्शक जीवन शर्मा यांनी पात्रतेसाठीच सर्व निधी तसेच एनर्जी कष्ट केल्यावर मुख्य स्पर्धेत अपेक्षा कशी बाळगणार, अशी विचारणा केली, पण सुशीला सर्व प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळलेली आहे, त्यामुळे काहीही घडू शकते, अशी टिप्पणी केली.


​ ​

संबंधित बातम्या