सुशील कुमारला गुन्हा घडलेल्या ठिकाणी नेऊन केली चौकशी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 May 2021

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा घडल्या ठिकाणी सुशील कुमारला नेऊन त्याची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. सुशील आणि त्याच्या साथीदारांनी नवोदित कुस्तीगीरांना छत्रसाल स्टेडियममध्ये मारहाण केल्याचा आरोप आहे.

क्रिकेट नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा घडल्या ठिकाणी सुशील कुमारला नेऊन त्याची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. सुशील आणि त्याच्या साथीदारांनी नवोदित कुस्तीगीरांना छत्रसाल स्टेडियममध्ये मारहाण केल्याचा आरोप आहे. 

या ठिकाणी प्रथम सुशीलला नेण्यात आले आणि त्या ठिकाणी सुमारे दोन तास चौकशी झाली. त्यानंतर हे पथक मॉडेल टाऊनमधील सुशीलच्या घरी तसेच त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या, पण भाड्याने दिलेल्या घरीही गेल्याचे समजते. दरम्यान, चौकशीच्यावेळी सुशीलने त्याच्यावरील आरोप फेटाळले आहेत, तसेच मी कशाला कोणाला मारू, माझा कोणत्याही गँगबरोबर कसलाही संबंध नाही, असे सांगतानाच चुकीचा सल्ला ऐकल्यामुळे मी पोलिसांपासून लपून होतो, असा दावा सुशीलने केल्याचे समजते.


​ ​

संबंधित बातम्या