ऑलिंपिकमध्ये भारतीयांबाबत भेदभाव होणार नाही - रिजिजू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 June 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंबाबत जपानमध्ये भेदभाव केला जाणार नाही, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला. कोरोनासाठी जपानमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहे, हे सत्य असले, तरी भारतीयांबाबत घेतलेल्या भूमिकेसाठी आम्ही अधिकृतपणे तक्रार नोंदविली आहे, असे रिजिजू म्हणाले.

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंबाबत जपानमध्ये भेदभाव केला जाणार नाही, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला. कोरोनासाठी जपानमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहे, हे सत्य असले, तरी भारतीयांबाबत घेतलेल्या भूमिकेसाठी आम्ही अधिकृतपणे तक्रार नोंदविली आहे, असे रिजिजू म्हणाले.

कोरोनाचा धोका जपानमध्ये कायम आहे, किंबहुना वाढत आहे. त्यासाठी जपान सरकारने ११ देशांतून येणाऱ्या खेळाडूंसाठी अतिशय कडक निर्बंध लादले आहेत आणि या ११ देशांत भारताचा समावेश आहे. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिंपिकसाठी जपानमध्ये येणाऱ्या भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना आगमनापूर्वी आठवडाभर दररोज कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. तसेच भारतातून प्रयाण करण्यापूर्वी तीन दिवस या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने कोणालाही भेटू नये, असेही निर्बंध तयार केले आहेत.

ऑलिंपिकच्या नियमानुसार कोणीही कोणाविरुद्ध असा भेदभाव करू शकत नाही, असे रिजिजू यांनी मीडियाशी ऑनलाईन संवाद साधताना सांगितले. 

तयारीवर समाधान
यंदाच्या या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंच्या तयारीवर रिजिजू यांनी समाधान व्यक्त केले. २०१२ च्या स्पर्धेत दोन रौप्यसह एकूण सहा पदके भारताने मिळवली होती. २०१६ च्या स्पर्धेत मात्र पदकांची संख्या दोनपर्यंतच मर्यादित राहिली होती.


​ ​

संबंधित बातम्या