भीषण अपघातातून वूडस्‌ बचावला; एका पायावर ओपन फ्रॅक्‍चर शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 February 2021

अपघाताचे स्वरूप पाहता वूडस्‌ केवळ नशिबाची साथ असल्यामुळे वाचला, असे लॉस एंजलिसमधील पोलिस आधिकाऱ्यांनी सांगितले.

लॉस एंजलिस : लॉस एंजलिसमधील भीषण अपघातातून टायगर वूडस्‌ बचावला आहे. वूडस्‌च्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली असून त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तो सध्या शुद्धीवर आहे, असे वूडस्‌च्या प्रवक्‍त्यांनी सांगितले.

वूडस्‌च्या एका पायावर ओपन फ्रॅक्‍चर शस्त्रक्रिया करण्यात आली, असे हार्बर यूएलसीए मेडिकल सेंटरमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिश महाजन यांनी सांगितले. याचा अर्थ वूडस्‌च्या पायातील हाडाचे दोनपेक्षा जास्त तुकडे झाले होते. त्याचबरोबर सूज आल्यामुळे स्नायूंवरीलही शस्त्रक्रिया करण्यात आली, असेही महाजन यांनी सांगितले.

INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​

अपघाताचे स्वरूप पाहता वूडस्‌ केवळ नशिबाची साथ असल्यामुळे वाचला, असे लॉस एंजलिसमधील पोलिस आधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस पथक मदतीसाठी गेले, त्या वेळी वूडस्‌ला उभेही राहता येत नव्हते. वूडस्‌ची कार दुभाजकावर आदळून कित्येक फूट लांब जाऊन थांबली. याचाच अर्थ वूडस्‌ कार नेहमीपेक्षा जास्त वेगाने चालवत होता; मात्र रस्त्याचे स्वरूप पाहता या मार्गावर नियमितपणे अपघात होतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 


​ ​

संबंधित बातम्या