ऑलिम्पिकची मशाल पेटली; 121 दिवसांच्या प्रवासाला दिमाखात सुरुवात

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 25 March 2021

या रिलेमध्ये जवळपास 10000 धावपटू सहभागी झाले असून जपानमधील 47 शहरातून रॅलीचा प्रवास नियोजित आहे.

कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली जगातील मानाची स्पर्धा म्हणजेच ऑलिम्पिक गेम्सला 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी 121 दिवसीय टॉर्च रिलेला गुरुवारपासून सुरुवात झाली. 23 जुलैला टोकियो ऑलिम्पिंकच्या उद्घाटन समारोहाच्या दिवशी या रिलेची सांगता होईल. 2011 मध्ये भूकंप, त्सुनामीचा सामना केलेल्या फुकुशिमा येथून रिलेची सुरुवात झाली आहे. जपानमध्ये याठिकाणी झालेल्या दुर्घटनेत जवळपास 18000 लोकांनी जीव गमावला होता. 

May be an image of one or more people

2011 मध्ये जपानला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जिंकून देणाऱ्या संघातील प्रमुख सदस्य अजुसा इवाशिमिझू हिने सर्वप्रथम मशाल हाती घेतल्याचे पाहायला मिळाले. पांढऱ्या रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये ती  इंडोअर फुटबॉल अभ्यास केंद्रातून मशाल हाती घेऊन बाहेर पडली.  यावेळी तिच्यासोबत 2011 मध्ये विश्वविजेतपद पटकवणाऱ्या संघातील अन्य 14 सदस्य आणि प्रशिक्षक नारियो ससाकी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वांनी पांढऱ्या रंगाचे ट्रॅकसूट घातले होते.  या रिलेमध्ये जवळपास 10000 धावपटू सहभागी झाले असून जपानमधील 47 शहरातून रॅलीचा प्रवास नियोजित आहे. 

May be an image of one or more people, people standing and indoor

पायाला दुखापत झाल्यावरही राहीचा रौप्यपदकाचा वेध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅलीसाठी चाहत्यांना नियमाचे पालन करण्याबाबत संदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या.  लाईव्ह स्टेमिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत या सोहळ्याची झलक पाहण्याची सुविधाही आयोजकांनी केली आहे.  स्थानिय आयोजन समितिच्या प्रमुख आणि माजी ऑलिम्पियन सेइको हाशिमोतो म्हणाल्या की. 'टोकियो ऑलिम्पिकची जपानमध्ये पेटलेली मशाल जगाला आशेचे किरण देणारी ठरेल.

May be an image of one or more people, people standing and outdoors

रिले दरम्यान रस्त्याच्या बाजूला उभे राहताना चाहत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. प्रेक्षकांनी उत्साहित होऊन अडथळा निर्माण केला तर रिलेचा मार्ग बदलावा लागेल किंवा प्रवास स्थगित केला जाईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. जपानचे पंतप्रधान योशीहाइड सुगा म्हणाले की, ऑलिम्पिक टॉर्च रिलेला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकांना ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक समजून घेण्याची ही योग्य संधी आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या