ऑलिपिक रद्द करण्याचा प्रश्‍नच नाही; टोकियो राज्यपालांची स्पष्टोक्ती

संजय घारपुरे
Tuesday, 15 December 2020

जपानवासीयांचा वाढता विरोध हा आजचा, स्पर्धा भविष्यात 

टोकियो : जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा दोनशे दिवसांवर असतानाही स्पर्धेस जपानवासीयांचा विरोध आहे. पण नव्या वर्षात होणारी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा रद्द होण्याचा प्रश्नच येत नाही, असे टोकियोच्या राज्यपालांनी स्पष्ट केले. 

कोरोनाची लाट पुन्हा उसळतीये; प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये नो एन्ट्री!

टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेबाबतच्या निर्णयाचा 2022 च्या बीजिंग हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेवरच नव्हे, तर 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकवरही परिणाम होईल, असा इशारा राज्यपाल युरिको कोईके यांनी दिला. जपानवासीय तसेच टोकियोतील नागरिक स्पर्धेच्या सध्या विरोधात आहेत, हे मीसुद्धा जाणते. ते वर्तमान लक्षात घेऊन बोलत आहेत. आम्ही भविष्यासाठी पूर्वतयारी करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

इंग्लिश प्रीमिअर लीग : जेम्स मॅडिसनच्या सलग दोन गोलमुळे लिसेस्टर सिटी विजयी   
 
शांतता काळात ऑलिंपिक रद्द होण्याची पहिलीच वेळ आली. नव्या वर्षात स्पर्धा होईलच, हे सांगताना ऑलिंपिक पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील ताण जाणवतो; मात्र कोईके स्पर्धा होणारच, असे सांगतात. त्या म्हणाल्या, कोणत्याही परिस्थितीत पुढील वर्षीची स्पर्धा रद्द होणार नाही. मनुष्याने कोरोनावर मात केली आहे, हे टोकियो ऑलिंपिक दाखवणार आहे. या स्पर्धेनेच बीजिंग हिवाळी तसेच पॅरिस ऑलिंपिक संयोजनाचा मार्ग खुला होणार आहे. कोरोनाविरुद्ध टोकियोनेच जोरदार प्रयत्न केले नाहीत, तर चार वर्षांनी होणाऱ्या पॅरिस स्पर्धेबाबत काय होईल. टोकियो ऑलिंपिक यशस्वी न झाल्यास त्याचा पॅरिसच्या पूर्वतयारीवर मोठा परिणाम होईल. 

जपानमध्ये वाढता विरोध 
जपानवासीयांचा ऑलिंपिक संयोजनास विरोध जास्त तीव्र होत आहे. जपानमधील एनएचके या राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात 27 टक्केच लोकांनी स्पर्धा आयोजनास पाठिंबा दिला. 31 टक्के लोकांनी स्पर्धा लांबणीवर टाकणे योग्य होईल, असे सुचवले. तर 32 टक्के लोकांनी रद्द करण्याचा तोडगा सुचवला. 

टोकियोच्या राज्यपाल म्हणतात.... 
- ऑलिंपिक संयोजनास सध्या असलेला विरोध नक्कीच कमी होईल 
- कोरोना रोखण्याचे उपाय सुरू आहेत, त्याला यश आल्यावर लोकांचे मत बदलेल 
- करार एका वर्षाने वाढल्यावर खर्च वाढणारच 
- स्पर्धेचा वाढता खर्च करायचा की स्पर्धा रद्द करायची, या प्रश्नावर चर्चाच होऊ शकत      नाही. 

स्पर्धेसमोरील आव्हान 
- जपानमध्ये सध्या कोरोनाची तिसरी लाट 
- जपान पंतप्रधानांचे प्रवास टाळण्याचे आवाहन, एवढेच नव्हे; तर देशातील पर्यटनास      चालना देण्याची मोहीम स्थगित 
- काही महिन्यांपूर्वीची चौरंगी जिम्नॅस्टिक स्पर्धा यशस्वी झाल्यानंतरही काहीसेच                आशादायक चित्र 
- कोरोनावरील लस आली; पण त्याची खेळाडू तसेच चाहत्यांना अद्याप सक्ती नाही 
- कोरोनावरील उपायांमुळे स्पर्धेचा खर्च 2.4 अब्ज डॉलरनी वाढण्याची भीती 
- यापूर्वीचा स्पर्धेचा खर्च 13 अब्ज डॉलरवर 
- स्पर्धेचा खरा खर्च गुपित असल्याचा दावा, 2013-18 दरम्यान अंदाजित खर्चाच्या दहा    पट खर्च झाल्याचा दावा


​ ​

संबंधित बातम्या