Tokyo Olympics 2021 : ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना लस देण्याचा प्लॅन; आरोग्य मंत्रालयाच्या मंजूरीची प्रतिक्षा

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 11 February 2021

टोकियोमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. खेळाडूंना लस कधी देणार यासंदर्भात क्रीडा मंत्रालयाने माहिती दिली आहे.

कोरोना विषाणूच्या संकट कमी झाले असले तरी जग अद्यापही यातून पुर्णत: सावरलेले नाही. योग्य ती खबरदारी करत सर्वच क्षेत्रात पुन्हा हालचाली सुरु झाल्या आहेत. क्रीडा क्षेत्रही याला अपवाद नाही. जगातील मानाची स्पर्धा 2020 मध्ये होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा या वर्षी खेळवण्यात येणार आहे. जपानमधील टोकियोमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत. मोठ्या ब्रेकनंतर मानाच्या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी बजावण्याचे मोठे शिवधन्युष्य सर्वच खेळाडूंना पेलावे लागणार आहे. टोकियोमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. खेळाडूंना लस कधी देणार यासंदर्भात क्रीडा मंत्रालयाने माहिती दिली आहे.

ऑलिम्पिकसाठी पात्र झालेले खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा समावेशे प्राधान्याने लस देणाऱ्यांच्या यादीत सामील करावा, अशी विनंती क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली होती. क्रीडा मंत्रालयाने यासाठी आराखडाही तयार केला असून आरोग्य मंत्रालयाकडून मंजूरी मिळण्याची आवश्यकता आहे. आरोग्य मंत्रालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना पुढील महिन्यांपासून लच टोचण्यात येईल, असा प्लॅन क्रीडा मंत्रालयाने बनवला आहे. 

INDvsENG : टीम इंडियाला टोला हाणणाऱ्या वॉनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा

मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिक पात्र खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्राथमिक सूचित ठेवण्याचा आग्रह करण्यात आला आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि इतर स्टाफला दोन टप्प्यात होणाऱ्या लसीकरणाबद्दल क्रीडा मंत्रालयाचा आराखडा तयार आहे. आम्ही आता केवळ आरोग्य मंत्रालयाकडून मंजूरी मिळण्याची वाट पाहत आहोत, असे त्यांनी सांगितले आहे. ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना एप्रिल अखेरपर्यंत लस टोचली जाईल, असे क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीवरुन समोर येते.  

ISL 2021 : 22 वय.. 21 मिनिटे.. 3 गोल.. 'काश्मिरी' पंडिताची कमाल! 

आतापर्यंत 74 खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध केली आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आले आहे. ज्या खेळाडूंनी आतापर्यंत पात्रता सिद्ध केली आहे त्यात 15 नेमबाज , 4 तिरंदाज, 32 हॉकी खेळाडू (पुरुष आणि महिला), 4 कुस्तीपटू,  9 बॉक्सर, 1 घोडेस्वार, 4 वैयक्तिक आणि 4x400 मीटर रिले टीम. अशा वेगवेगळ्या प्रकारातील खेळाडूंचा समावेश आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या