टोकियो ऑलिंपिकचा  अपेक्षित खर्च... 11,37,20,69,75,361 रुपये

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 23 December 2020

या स्पर्धेसाठीचा प्रामुख्याने खर्च जपान सरकार करणार आहे. एकंदरीत खर्चापैकी 6 अब्ज 70 कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 494 अब्ज 75 कोटी 79 लाख रुपये खासगी खर्चातून उभारण्यात आले आहेत.

टोकियो : टोकियो ऑलिंपिकचा खर्च सातत्याने वाढत आहे. एक वर्ष स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे खर्चात 22 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता हा खर्च 15.4 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 1137 अब्ज 20 कोटी 70 लाख रुपये (11,37,20,69,75,361 रुपये) झाला आहे.

ऑलिंपिक संयोजकांनी स्पर्धा खर्चाची माहीती दिली. गतवर्षीच्या अंदाजपत्रकात स्पर्धेचा खर्च 12 अब्ज 60 कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 930 अब्ज 44 कोटी 21 लाख रुपये होता. हा अतीरिक्त 2 अब्ज 80 कोटी डॉलर म्हणजेच 206 अब्ज 76 कोटी 49 लाख रुपये खर्च स्पर्धा एक वर्ष लांबल्यामुळे वाढला आहे. 2013 मध्ये टोकियोला ऑलिंपिक स्पर्धेचे संयोजन देण्यात आले. त्या वेळी हा खर्च 7 अब्ज 50 कोटी डॉलर म्हणजेच 553 अब्ज 83 कोटी 45 लाख रुपये असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

कोच परदेशात अडकले; ऑलम्पिक पात्र बॉक्सरची परराष्ट्रमंत्र्यांकडे धाव

या स्पर्धेसाठीचा प्रामुख्याने खर्च जपान सरकार करणार आहे. एकंदरीत खर्चापैकी 6 अब्ज 70 कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 494 अब्ज 75 कोटी 79 लाख रुपये खासगी खर्चातून उभारण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती तसेच टोकियो संयोजन समितीने सरकारकडून होणारा खर्च कमीत कमी असावा यासाठीच प्रयत्न करण्याची गरज आहे; अन्यथा भविष्यात स्पर्धा संयोजनाचा विचार करणारे देश खच्ची होतील, असा इशारा जर्मनीतील अभ्यासक फ्रान्झ वाल्डनबेर्गर यांनी दिला.

प्रत्यक्षातील खर्च 
1846 अब्ज 11 कोटी रुपये?
टोकियो ऑलिंपिकवरील खर्च 15.4 अब्ज डॉलर (1137 अब्ज 20 कोटी रुपये) सांगितला जात असला तरी प्रत्यक्षातील हा खर्च 25  अब्ज डॉलर (1846 अब्ज 11 कोटी रुपये) असल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.

लक्षवेधक
 संयोजकांनी आदरातिथ्य     सेवेत कपात करत असल्याचे ऑक्‍टोबरमध्ये सांगितले होते.
 यामुळे २८ कोटी डॉलरनी खर्च कमी झाल्याचा दावा संयोजकांनी केला होता.
 संयोजकांचा स्पर्धा कमी करण्यास, तसेच क्रीडापटूंची संख्या कमी करण्यास विरोध.
 कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जपानमध्ये स्पर्धेला वाढता विरोध.
 जनमत चाचणीत 63 टक्के जपानवासीयांची स्पर्धा रद्द करण्यास अथवा लांबणीवर टाकण्यास पसंती.
 स्थानिक पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न.
 दीड कोटी डॉलरचे नवे पुरस्कर्ते निश्‍चित झाले असल्याचे संकेत.
 स्पर्धेसाठीच्या विमा रकमेतून 50 कोटी डॉलर मिळणार असल्याचे संकेत.


​ ​

संबंधित बातम्या