टोकियोतील स्पर्धा हे माझे अखेरचे ऑलिंपिक"

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 March 2021

मेरी 1 मार्चला 38 वर्षांची झाली. टोकियो ऑलिंपिकसाठी बॉक्‍सरचे जास्तीत जास्त वय 40 असणार होते, ते आता 41 करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : टोकियोतील स्पर्धा माझी अखेरची ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा असेल, असे मेरी कोमने सांगितले. या स्पर्धेसाठी बॉक्‍सर मेरी कोम 51 किलो गटासाठी पात्र ठरली आहे. टोकियोतील स्पर्धा अखेरची ऑलिंपिक स्पर्धा असेल. वय महत्त्वाचे असते. मी आत्ता 38 वर्षांची आहे. स्पर्धेच्यावेळी 39 वर्षांची असेन. तीन वर्षे खूप जास्त झाली. मी खेळण्यास कितीही तयार असले तरी मला पॅरिसला खेळण्याची संधी मिळणार नाही, असे मेरी कोमने सांगितले.

सलामीला अनेक पर्याय, पण चौथ्या क्रमांकाबाबत निर्णय नाही 

मेरी 1 मार्चला 38 वर्षांची झाली. टोकियो ऑलिंपिकसाठी बॉक्‍सरचे जास्तीत जास्त वय 40 असणार होते, ते आता 41 करण्यात आले आहे. मी ऑलिंपिक खेळले नसते तर या कारकीर्दीस अर्थ राहिला नसता. मात्र मला २०१२ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. मीच काय प्रत्येक खेळाडूसाठी ऑलिंपिक स्वप्न असते. त्यात पदक जिंकण्याचे लक्ष्य असते. ऑलिंपिक ब्राँझ पदकाने माझ्यासाठी खूप काही बदलले, असे मेरी म्हणाली. तिने मुलींनी घराबाहेर येऊन बॉक्‍सिंग करावे. घराबाहेर पडण्यासाठी कोणतेही निर्बंध नसावेत, अशी अपेक्षा मेरी कोमने व्यक्त केली. 
 


​ ​

संबंधित बातम्या