टीटीएफआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष एस.एम. सुलतान यांचे कोरोनामुळे निधन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

भारतीय टेबल टेनिस महासंघाचे (टीटीएफआय) वरिष्ठ उपाध्यक्ष एस.एम. सुलतान यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

भारतीय टेबल टेनिस महासंघाचे (टीटीएफआय) वरिष्ठ उपाध्यक्ष एस.एम. सुलतान यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी 61 वर्षीय एस.एम. सुलतान यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.  

अव्वल महिला टेनिसपटूला कोरोनाची लागण 

एस.एम. सुलतान यांच्या आईचे 10 दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यानंतर त्यांची पत्नी लुबाना मौसावी आणि मुलगा जावेद मौसवी यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. ज्यामध्ये त्यांच्या पत्नीचे शुक्रवारी निधन झाले. तर मुलगा जावेद मौसवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना महामारीत उत्तेजकाची संधी साधू नका

टीटीएफआयचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला आणि सरचिटणीस खासदार सिंह आणि सल्लागार डी.आर. चौधरी यांनी सुलतान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या