ऑलिंपिकहून परतल्यावर दोन आठवड्यांचे विलगीकरण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 August 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून मायदेशी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दोन आठवड्यांच्या विलगीकरणास सामोरे जावे लागणार आहे. टोकियोतून परतल्यानंतर या सर्व खेळाडूंना सरकारच्या सिडनी, ब्रिस्बेन, गोल्ड कोस्ट, पर्थ, मेलबर्न येथील हॉटेलमध्ये विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.

सिडनी - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून मायदेशी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दोन आठवड्यांच्या विलगीकरणास सामोरे जावे लागणार आहे. टोकियोतून परतल्यानंतर या सर्व खेळाडूंना सरकारच्या सिडनी, ब्रिस्बेन, गोल्ड कोस्ट, पर्थ, मेलबर्न येथील हॉटेलमध्ये विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल. 

ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ऑलिंपिकची सांगता होईपर्यंत ऑस्ट्रेलियाचे जवळपास ८५३ खेळाडू व सहाय्यक कर्मचारी टोकियोवरून टप्या टप्याने मायदेशात परतणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी त्यांची स्पर्धा संपल्यानंतर ४८ तासांत आपापल्या मायदेशासाठी निघणे बंधनकारक आहे.  टोकियोत  कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुरुषांच्या रोइंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते स्पेंसर टुरिन, अलेक्झांडर हिल, अलेक्झांडर पुर्नेल व जॅक हॅग्रीव्हस व महिला चॅम्पियन लुसी स्टीफन, रोझमेरी पोपा आणि अॅनाबेल मॅकइन्टायर हे खेळाडू आधीच ऑस्ट्रेलियाला परतले आहेत. 

उद्‍घाटन सोहळ्यात ऑस्ट्रेलियाची महिला ध्वजवाहक एलेना गॅलियाबोविचदेखील देशात परतली आहे. क्रीडानगरीतील सर्वच खेळाडू स्पर्धा संपल्यानंतर मायदेशी परतत आहेत.


​ ​

संबंधित बातम्या