लसीकरणानंतरही युगांडाचे खेळाडू जपानमध्ये बाधित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 June 2021

लसीकरण पूर्ण होऊन जपानमध्ये दाखल झालेल्या युगांडाच्या पथकातील सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. ऑलिंपिक स्पर्धेसंबंधातील ही पहिली घटना आहे.

टोकियो - लसीकरण पूर्ण होऊन जपानमध्ये दाखल झालेल्या युगांडाच्या पथकातील सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. ऑलिंपिक स्पर्धेसंबंधातील ही पहिली घटना आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती लसीकरण झालेलेच खेळाडू, पदाधिकारी येणार असल्याने स्पर्धा सुरक्षित असल्याचे सांगत होते. त्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

युगांडा संघातील सर्व सदस्यांनी अॅस्त्राझेंका ही लस घेतली होती. मायदेशात ते सर्व कोरोना चाचणीत निगेटिव ठरले होते. युगांडाचा संघ शनिवारी जपानमध्ये दाखल झाल्यावर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. संघाचे मार्गदर्शक जपानमधील पहिल्याच कोरोना चाचणीत पॉझिटिव आढळले. पथकातील उर्वरित आठ सदस्य सरावासाठी ओसाकास रवाना झाले. 


​ ​

संबंधित बातम्या