खो-खो लीगचे सोनीवर थेट प्रक्षेपण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 March 2021

फ्रॅंचाईसच्या धर्तीवर होणाऱ्या या लीगमध्ये 150 भारतीय खेळाडूंना संधी मिळणार आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेत समालोचन करण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : सर्वात वेगवान खेळ, अशी ओळख असलेल्या खो-खोच्या अल्टिमेट खो-खो लीगच्या थेट प्रसारणासाठी सोनी पिक्‍चर नेटवर्कने सहकार्याचा हात दिला आहे. भारतीयांसह परदेशी प्रेक्षकांनाही आकर्षित करण्यासाठी नियोजित होत असलेली ही लीग यंदाच्या वर्षात अपेक्षित आहे. टीव्ही प्रेक्षकांसह ओटीटी प्लॅटफॉर्मही मोबाईलसॅव्ही प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘सोनी लिव’वर थेट प्रक्षेपण होणार आहे. फ्रॅंचाईसच्या धर्तीवर होणाऱ्या या लीगमध्ये 150 भारतीय खेळाडूंना संधी मिळणार आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेत समालोचन करण्यात येणार आहे. 

खो खो  हा भारतीय खेळ प्रकार आहे. त्यामुळेच सोनी पिक्सच्या माध्यमातून हा खेळ लोकांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. खेळाला नवे रंग रुप देण्याचा प्रयत्न अल्टीमेट खो खो, केकेएफआय आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्‍स इंडिया यांच्याकडून करण्यात येणार आहे. खेळ टेलिव्हिडन फ्रेडली करण्यासाठी मल्टीपल कॅमरा आणि मल्टीपल अँगलमध्ये प्रसारण दाखवण्यात येणार आहे. 

Video: बुमराह-संजनाच्या शानदार लग्नसोहळ्याची छोटीशी झलक

"अल्टीमेट खो-खो देशातील सर्वात जुन्या खेळाला नव्या रंगात समोर आणणार आहे. खेळालाच नव्हे तर प्रेक्षकांनाही याची एक नवी अनुभूती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे डाबर ग्रुपचे अध्यक्ष आणि अल्टीमेट खो-खोचे  प्रमोटर अमित बर्मन यांनी म्हटले आहे.  भारतीय खो-खो फेडरेशनच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील खेळाडू आणि 18 वर्षांच्या आतील युवा पुरुष गटातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या वर्षाच्या मध्यापर्यंत संभाव्य खेळाडूंची यादी तयार करण्यात येणार असून यातून अंतिम 150 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.  


​ ​

संबंधित बातम्या