पुण्यातील तिरंदाजी शिबिराबाबत अनिश्‍चितता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

सपोर्ट स्टाफ सदस्यास ताप आल्यामुळे चिंतेचे वातावरण

मुंबई : टोकियो ऑलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी भारतीय तिरंदाजांचे सराव शिबिर पुण्यातील लष्कर क्रीडा संस्थेत सुरू आहे; मात्र या शिबिरातील सपोर्ट स्टाफपैकी एका सदस्यास ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यामुळे शिबिराबाबत अनिश्‍चितता असल्याची चर्चा तिरंदाजी वर्तुळात सुरू आहे.

डिप्रेशनमुळे दिग्गज खेळाडू हॉस्पिटलमध्ये  

सपोर्ट स्टाफमधील व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही; मात्र शिबिरातील सर्वांच्याच हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. कोरोना महामारी असल्यामुळे जास्त काळजी घेतली जात असल्याचे समजते. शिबिरातील सराव काही दिवसांपासून स्थगित असल्याचे सांगण्यात येते, पण त्यास अन्य सूत्रांनी दुजोरा दिला नाही; मात्र तिरंदाजांना आता त्यांच्या रूममध्ये भोजन तसेच नाश्‍ता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. यापूर्वी तिरंदाज डायनिंग हॉलमध्ये गटागटाने जात असत.

हेल्मेट सक्ती काळाची गरज; सचिनचा आयसीसीला सल्ला

सपोर्ट स्टाफला ताप आला आहे, त्यामुळे शिबिरातील सर्वांची नव्याने कोरोना चाचणी घेण्याची सूचनाही करण्यात येत आहे. महामारी असताना जास्त खबरदारी घेणे कधीही चांगले, असेही मत व्यक्त होत आहे. 

काळजी नको, सराव सुरळीतपणे सुरू
सपोर्ट स्टाफपैकी एक जण आजारी आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; मात्र तिरंदाजांचा सराव नियमितपणे सुरू आहे. त्यात खंड पडलेला नाही, असे तिरंदाजी संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 


​ ​

संबंधित बातम्या