ऑलिम्पिक चॅम्पियन अमेरिकन महिला खेळाडूवर निलंबनाची कारवाई

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 15 January 2021

2017 मध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियशिप स्पर्धेत तिला भाग घेता आला नव्हता. यावेळी देखील तिला एक वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते.

ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर अडथळा शर्यतीमध्ये (हर्डल्स) सुवर्ण पदक मिळवणारी ब्रियाना मॅकनीलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या अँटि-डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर बंदी घालण्यात आली. अ‍ॅथलेटिक्स इंटेग्रिट यूनिट  (एआययू) ने गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली. 

स्लेजिंगचा खेळ! खुन्नस देणं नडलं; श्रीसंतची मुंबईकरानं केली धुलाई (VIDEO)

29 वर्षीय मॅकनीलने 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. 2013 मध्ये जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिने बाजी मारली होती. 2017 मध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियशिप स्पर्धेत तिला भाग घेता आला नव्हता. यावेळी देखील तिला एक वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. 12 महिन्यात तिने तीन ड्रग्ज चाचणीसाठी अनुपस्थितीत राहिल्याने तिच्यावर यापूर्वी कारवाई झाली होती.  भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या