राहीसह चार नेमबाजांचे उद्या लसीकरण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 June 2021

राही सरनोबतसह चार नेमबाजांचे ९ जूनला लसीकरण होणार आहे. त्याच दिवशी नेमबाजी संघातील अन्य सदस्य आपला दुसरा डोसही घेणार आहेत. राहीनेच ही माहिती ‘सकाळ’ला दिली आहे. 

मुंबई - राही सरनोबतसह चार नेमबाजांचे ९ जूनला लसीकरण होणार आहे. त्याच दिवशी नेमबाजी संघातील अन्य सदस्य आपला दुसरा डोसही घेणार आहेत. राहीनेच ही माहिती ‘सकाळ’ला दिली आहे. 

ऑलिंपिकला पात्र ठरण्याची शक्यता असलेल्या सव्वाशेपैकी १२० खेळाडूंनी पहिला डोस घेतला आहे, तर त्यातीलच ५८ खेळाडूंचे दोन्ही डोस झाले आहेत; पण राहीसह सौरभ चौधरी, दीपक कुमार आणि मेईराजअहमद खान तसेच बॉक्सर सिमरनजीत यांनी एकही डोस घेतला नसल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यानी सांगितले. 

ऑलिंपिकला पात्र ठरलेल्या माझ्यासह चार नेमबाजांना मार्चमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आमचा भारतात एकही डोस झाला नव्हता. आता आम्हाला नऊ जूनला पहिला डोस देण्यात येईल, असे राहीने ‘सकाळ’ला सांगितले. 
क्रोएशियातील शिबिरासाठी निघण्यापूर्वी नेमबाजी संघातील काही जणांनी पहिला डोस घेतला होता. कोरोनातून नुकतेच आम्ही बरे झाल्यामुळे माझ्यासह चौघांना डोस देण्यात आला नव्हता,असेही तिने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या