भारतीय ऑलिंपिक संघटना `वाडा`ची परवानगी घेणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 April 2021

ऑलिंपिक पात्र खेळाडूंना कोरोनाची लागण झाली नसतील तरी ते प्रशिक्षण घेत असलेल्या ठिकाणी रुग्ण आढळणे ही चिंतेची बाब आहे. ऑलिंपिक पात्र खेळाडूंना तातडीने लस देण्याची गरज आहे.

नवी दिल्ली : जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) मंजुरी दिल्यानंतरच ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय खेळाडूंचे लसीकरण होणार असल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेने स्पष्ट केले. आम्ही यासंदर्भात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसही (एम्स) पत्र लिहिले आहे, असे संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी सांगितले.  

पतियाळा तसेच बंगळूर येथील राष्ट्रीय क्रीडा प्रगती संस्थेत मार्गदर्शन घेत असलेल्या 741 क्रीडापटू तसेच पदाधिकाऱ्यांची नुकतीच कोरोना चाचणी झाली होती. त्यातील 30 जणांना बाधा झाली असल्याचे चाचणीत आढळले. बाधित व्यक्तीत ऑलिंपिकला पात्र ठरलेल्या एकाही क्रीडापटूचा समावेश नाही. 

IPL मध्ये 7 वर्षानंतर चान्स मिळाल्यावर पुजाराने बदलला स्टान्स

ऑलिंपिक पात्र खेळाडूंना कोरोनाची लागण झाली नसतील तरी ते प्रशिक्षण घेत असलेल्या ठिकाणी रुग्ण आढळणे ही चिंतेची बाब आहे. ऑलिंपिक पात्र खेळाडूंना तातडीने लस देण्याची गरज आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयास दोनदा पत्र लिहिले पण त्यांचे उत्तरही आलेले नाही, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी सांगितले. आम्ही एम्समधील निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे सचिव डॉ. राजीव रंजन यांच्यासह दोनदा चर्चा केली आहे. त्यांनी खेळाडूंच्या लसीकरणाची तयारी दाखवली आहे. त्यामुळे त्यांना याबाबत अधिकृत पत्र पाठवणार आहोत, असे मेहता यांनी सांगितले. 

ऑलिपिंक पात्र खेळाडूंचे लसीकरण करण्यापूर्वी जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची मंजुरी आवश्यक आहे, अशी सूचना महासंघाचे अध्यक्ष नरींदर बत्रा यांनी केली, त्यामुळे आम्ही त्यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्याकडून तातडीने उत्तराची प्रतिक्षा आहे. त्यानंतरच ऑलिंपिक पात्र क्रीडापटूंचे लसीकरण सुरु होईल, असे मेहता म्हणाले. 
 


​ ​

संबंधित बातम्या