अनुभवी बॉक्सिंगप्रशासक राजकुमार संचेती यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 May 2021

भारतीय बॉक्सिंग महासंघाचे कार्यकारी संचालक राजकुमार संचेती (वय ५६) यांचे कोरोनामुळे निधन झाले. बॉक्सिंग प्रशासनात गेली काही वर्षे मोलाची कामगिरी करीत असलेल्या संचेती यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते काही दिवस व्हेंटिलेटरवर होते.

मुंबई - भारतीय बॉक्सिंग महासंघाचे कार्यकारी संचालक राजकुमार संचेती (वय ५६) यांचे कोरोनामुळे निधन झाले. बॉक्सिंग प्रशासनात गेली काही वर्षे मोलाची कामगिरी करीत असलेल्या संचेती यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते काही दिवस व्हेंटिलेटरवर होते.

ते आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ऑलिंपिक टास्क फोर्सचे सदस्य होते. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने जागतिक बॉक्सिंग महासंघाची हकालपट्टी केल्यानंतरही खेळास कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी बॉक्सिंगच्या पात्रता स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी झालेल्या बैठकीस संचेती खास निमंत्रित होते.


​ ​

संबंधित बातम्या