विनेशच्या ताकदीला तोड नाही ; आठवड्याभरातील दुसऱ्या सुवर्णासह ठरली जगात भारी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 7 March 2021

सुवर्ण कामगिरीनंतर आता ती आपल्या गटात अव्वलस्थानावर विराजमान झाली आहे.   

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसध्येला भारतीय नारीनं सातासमुद्रापलीकडे पुन्हा एकदा आपला दबदबा दाखवून दिला. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने अपेक्षेला साजेसा खेळ करत माटियो पॅलिकोन रँकिंग कुश्ती सीरीजमध्ये गोल्डन कामगिरी केलीय. आठवड्याभरात विनेशचे हे दुसरे सुवर्ण पदक आहे. सात दिवसांच्या आता दुसऱ्यांदा सुवर्ण कामगिरीनंतर तिने आपल्या वजनी गटातील रँकिंगमध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. 

जागतिक कुस्तीस्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या 26 वर्षीय विनेश टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारी एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. तिने 53 किलो वजनी गटातील फायनलमध्ये कॅनडाच्या  डायना मॅरी हेलन वीकरला 4-0 असे पराभूत केले.  

IPL 2021 स्पर्धेसाठी मोठी अ‍ॅडजेस्टमेंट; पहिल्यांदाच दिसणार नवे चित्र

विनेशने पहिल्या फेरित सर्वच्या सर्व गुण मिळवले. पुढच्या फेरित आघाडी कायम राखत तिने गोल्ड मेडल पक्के केले.  विनेशने मागील आठवड्यातच कीव येथील स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते. सातत्यपूर्ण कामगिरीने ऑलिम्पिकसाठी ती योग्य मार्गाने प्रवास करत असल्याचे दिसते. या स्पर्धेत प्रवेश केला तेव्हा जागतिक कुस्ती रँकिंगमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर होती. सुवर्ण कामगिरीनंतर आता ती आपल्या गटात अव्वलस्थानावर विराजमान झाली आहे.   


​ ​

संबंधित बातम्या