कोहलीचे आणखी एक ‘शतक’ इंस्टावर 10 कोटी फॉलोअर्स

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 March 2021

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल आहे.  

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीचा शतकांचा धडाका सध्या आटला असला, तरी सोशल मीडियावर मात्र त्याची बॅटिंग फारच जोमात सुरू आहे. इंस्टाग्रामवर त्याचे तब्बल 10 कोटी (100 मिलियन) फॉलोअर्स झाले असून क्रिकेट विश्‍वात सर्वाधिक फॉलोअर्स असलेला तो पहिला क्रिकेपटू ठरला आहे. एशिया पॅसिफकमध्येही इन्स्टाग्रामवर एवढे मोठे फॉलोअर्स असलेला विराट पहिला आहे. आयसीसीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. क्रिकेट विश्‍वात सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या विराटने कसोटी सामन्यांत 27; तर एकदिवसीय सामन्यांत 43 शतके केलेली आहेत; मात्र त्याचे अखेरचे शतक 2019 मध्ये झाले होते.

INDvsENG 4th Test Pich Prediction : फिरकीस साथ, पण नसेल ‘आखाडा’

भारतातील सर्वाधिक फॉलोअर्स

  • 10 कोटी 1 लाख - विराट कोहली
  • 6 कोटी 8 लाख - प्रियांका चोप्रा
  • 5 कोटी 1 लाख - श्रद्धा कपूर
  • 5 कोटी 3 लाख - दीपिका पदुकोन
  • 5 कोटी 7 लाख - नेहा कक्कर
  • 5 कोटी 2 लाख - नरेंद्र मोदी
  • 5 कोटी  - अलिया भट
  • 4 कोटी 3 लाख - अक्षय कुमार
  • रोनाल्डोचे सर्वाधिक 26.5 कोटी फॉलोअर्स

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल आहे. त्याचे 26.6 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यानंतर लिओनेल मेस्सी (18.6 कोटी), नेमार (14.7 कोटी) अशी क्रमवारी आहे.


​ ​

संबंधित बातम्या