महिला कुस्तीगीरांचे आजपासून सराव शिबिर

संजय घारपुरे
Monday, 19 October 2020

शिबिरात सहभागी झालेल्या सर्व महिला कुस्तीगीरांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. उद्यापासून शिबिर सुरू होणार असले तरी त्यात तंदुरुस्ती, जिम ट्रेनिंग, धावणे तसेच कसरतींचा समावेश असेल.

लखनौ  : दोन वेळा लांबणीवर टाकण्यात आलेल्या राष्ट्रीय महिला कुस्ती शिबिरास उद्यापासून (सोमवार, ता. 19) सुरुवात होईल; मात्र प्रत्यक्ष कुस्तीचा सराव आठ दिवसांनी सुरू होणार आहे. या शिबिरात ऑलिंपिकला पात्र ठरलेल्या विनेश फोगटसह 12 कुस्तीगीर दाखल झाल्या आहेत. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारापूर्वी झालेल्या चाचणीत विनेशला कोरोनाची बाधा झाल्याचे कळले होते.

तिला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार होते. दरम्यान, ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिका (62 किलो), सीमा (50 किलो), ललिता (53 किलो), नीशा (68 किलो) या 25 ऑक्‍टोबरला शिबिरात दाखल होणार आहेत. या चौघी मंगळवारी दाखल होणार होत्या, पण त्यांना 25 ऑक्‍टोबरला येण्यास भारतीय कुस्ती महासंघाने सांगितले. 

IPL 2020 : राहुलचं आणखी एक अर्धशतक; अब तक 500+

शिबिरात सहभागी झालेल्या सर्व महिला कुस्तीगीरांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. उद्यापासून शिबिर सुरू होणार असले तरी त्यात तंदुरुस्ती, जिम ट्रेनिंग, धावणे तसेच कसरतींचा समावेश असेल. मॅटवरील सराव 26 ऑक्‍टोबरपासून होणार आहे, असे राष्ट्रीय मार्गदर्शक कुलदीप मलिक यांनी सांगितले. हे शिबिर 31 डिसेंबपर्यंत कोणत्याही ब्रेकविना होणार आहे. 

IPL 2020 : अंपायरच्या लुक्सवरून सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

शिबिरातील कुस्तीगीर- 50 किलो  : निर्मला देवी, पिंकी, अंकुश. 53 किलो : विनेश फोगट, अंजू. 57 किलो : अंशू मलिक, सरीता मोर, पूजा धांदा. 62 किलो : सोनम मलिक, नवजोत कौर. 68 किलो : दिव्या काक्रण, अनिता.
  


​ ​

संबंधित बातम्या