वर्ल्ड चॅम्पियन ख्रिस्टियन कोलमनवर दोन वर्षांसाठी बंदी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीतील वर्ल्ड चॅम्पियन ख्रिस्टियन कोलमनवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीतील वर्ल्ड चॅम्पियन ख्रिस्टियन कोलमनवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ख्रिस्टियन कोलमनवर डोपिंग नियंत्रणाशी संबंधित तीन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आलेली आहे. ट्रॅक अँड फील्डच्या अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने ही कारवाई करताना कोलमनला मे 2022 पर्यंत बंदी घालण्यात आ;युनोचे म्हटले आहे. 

असा असेल भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा 

ख्रिस्टियन कोलमनवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे त्याला पुढच्या वर्षी टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. 24 वर्षीय अमेरिकन धावपटू ख्रिस्टियन कोलमनला मे मध्ये तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. कोलमन 2019 मध्ये तीन वेळेस नमुना गोळा करणार्‍या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहू शकला नव्हता.

रोहितच्या दुखापतीचे सत्य समजायला हवे 

खेळाडू बारा महिन्यांच्या आत तीनदा 'राहण्याचे ठिकाण' चे उल्लंघन केले तर त्याला दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागते. कोलमन स्पोर्ट्स ट्रिब्यूनलमध्ये  या कारवाईविरूद्ध अपील करु शकतो. ख्रिस्टियन कोलमनला यावेळी होणाऱ्या ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होते. त्याने दोहा, कतारमध्ये 2019 मध्ये 100 मीटर आणि फोर मल्टिप्लाय 100 मीटर सुवर्ण पदके जिंकली. 
 


​ ​

संबंधित बातम्या