जागतिक चॅम्पियन सलवा ईद नासेरवर बंदीची शक्यता 

टीम ई-सकाळ
Friday, 13 November 2020

महिलांच्यातील 400 मीटर शर्यतीतील जागतिक चॅम्पियन सलवा ईद नासेरवर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

महिलांच्यातील 400 मीटर शर्यतीतील जागतिक चॅम्पियन सलवा ईद नासेरवर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नासेरवर ठेवण्यात आला आहे. दोहा कतारमध्ये झालेल्या महिलांच्या 400 मीटर शर्यतीत बावीस वर्षीय नासेरने सर्वांना मागे टाकत विजेतेपद मिळवले होते. 

भारताचा एशियन चषक पात्रता फेरीचा सामना मार्च मध्ये  

ट्रॅक अँड फील्ड अ‍ॅथलेटिक्स युनिटने मागच्या महिन्यात नासेरचा खटला बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात क्रीडा लवादामध्ये अपील केल्याचे म्हटले आहे. तर नायजेरियात जन्मलेल्या आणि बहारीन कडून खेळणारी नासेर डोपिंग चाचणीसाठी उपस्थित राहू शकला नाही. आणि शिवाय नमुना अधिकारी तिचे डोप सॅम्पल कुठे येऊन घेऊ शकतात हे सांगण्यातही ती अपयशी ठरली आहे. याव्यतिरिक्त हे आरोप यापूर्वी तांत्रिक कारणास्तव फेटाळले गेले होते. 

SL 2020 'बायो बबल'मध्ये दिवस घालवणं कठिण: सुनील छेत्री

नासेरने मागील वर्षी 48.14 सेकंदात शर्यत पूर्ण केल्यावर जागतिक अजिंक्यपद मिळवले होते. व जकार्ता येथे खेळल्या गेलेल्या एशियन गेम्समध्ये बहारीनच्या या  खेळाडूने सुवर्णपदक जिंकले होते. तर 2017 च्या वर्ल्डचॅम्पियनशिप मध्ये नासेर दुसऱ्या स्थानावर राहिली होती. 


​ ​

संबंधित बातम्या