विनेश फोगाटची गोल्डन कामगिरी; पाहा परदेशातील सामन्याचा विजयी क्षण (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 28 February 2021

तिने 2017 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन आणि जागतिक कुस्ती क्रमवारीत सातव्य क्रमांकावर असलेल्या बेलारूसच्या वेनेसा कलाजिंसकाया हिला 10-8 अशा फरकाने पराभूत केले. 

युक्रेनची राजधानी कीव येथील  XXIV आउटस्टँडिंग यूक्रेनियन रेसलर्स आणि कोचेस मेमोरियल स्पर्धेत भारताची दिग्गज महिला कुस्तीपटू  विनेश फोगाटने गोल्डन कामगिरी केलीय. खेलरत्न सन्मानित कुस्तीपटूनं रविवार 53 किलो ग्रॅम वजनी गटात सुवर्ण पदकाची कामाई केली.  तिने 2017 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन आणि जागतिक कुस्ती क्रमवारीत सातव्य क्रमांकावर असलेल्या बेलारूसच्या वेनेसा कलाजिंसकाया हिला 10-8 अशा फरकाने पराभूत केले. 

ICC Test Rankings : रोहितची सर्वोत्तम रँकिंगला गवसणी; अश्विनलाही झाला फायदा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कुस्ती आखाड्यापासून जवळपास एक वर्षांपेक्षा अधिक काळ दूर असलेल्या विनेशची ही पहिली स्पर्धा होती. विनेशने यापूर्वीट टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय.  या स्पर्धेत विनेशने शनिवारी सेमीफायनलमध्ये रोमानियाच्या एना ए हिला 2-0 अशा फरकाने पराभूत केले होते. राउंड ऑफ-16 मध्ये लूलिया लिओर्डा आणि क्वार्टरफायनलमध्ये तिने कॅट्सियारिना पिचकोसकायाला पराभूत केले होते. विनेश नोव्हेंबर 2020 पासून युरोपात ट्रेनिंग घेत आहे. लॉकडाउनच्या काळात विनेशने हरियाणातील आपल्या गावातच सराव करण्यास प्राधान्य दिले होते.  

2 राष्ट्रकुल स्पर्धेसह आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी विनेशने पोलंडमध्ये आघाडीच्या कुस्तीपटूंसोबत सराव करत आहे. पुढील स्पर्धेसाठी विनेश रोमला जाणार आहे. याठिकाणी ती  4 ते 7 मार्च दरम्यान आणखी एका स्पर्धेत सहभागी होणार आहे.  विनेशने राष्ट्रकुल स्पर्धेत (2014,2018)आणि 2018 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती.  


​ ​

संबंधित बातम्या