'झिरो टू आयर्न मॅन'चा पहिला एपिसोड;  आयर्न मॅन स्पर्धा म्हणजे नक्की काय?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 15 January 2021

जर आपण रॉबर्ड जाउनी आणि बॉलिवूड चित्रपटाच्या पलीकडे जाऊन विचार केला तर ही एक जगातील लौकिक मिळालेली क्रीडा स्पर्धा असल्याचे आपल्या लक्षात येईल. पोहणे धावणे आणि सायकल चालवणे अशा तीनही स्पर्धांमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी असते.

'झिरो टू आयर्न मॅन'  या नव्या संकल्पनेच्या पहिल्या एपिसोडमध्ये आयर्न मॅन म्हणजे नेमक काय? हे आपण जाणून घेणार आहोत.  आयर्न मॅन स्पर्धेत उतरुन ही मानाची आणि आव्हानात्मक स्पर्धेतील चॅलेंज पार करणारे पहिले भारतीय म्हणून ज्यांना आळखले जाते ते  डॉ. कौस्तुभ राडकर खास एपिसोडच्या माध्यमातून  आव्हानात्मक स्पर्धेसंदर्भातील माहिती देत आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये त्यांनी आयर्न मॅन म्हणजे नेमक काय हे सांगितले आहे.  

बऱ्याचदा लोक मला आयर्न मॅन आहेस म्हणजे चित्रपटात वैगेर काम करतोस का? असा प्रश्न विचारायचे. याच कारण आयर्न मॅन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो रॉबर्ट डाउनी. पण तस नाही, हे स्पष्ट करत त्यांनी जगभरातील विविध देशात आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेविषयी माहिती दिली.  

जर आपण रॉबर्ड जाउनी आणि बॉलिवूड चित्रपटाच्या पलीकडे जाऊन विचार केला तर ही एक जगातील लौकिक मिळालेली क्रीडा स्पर्धा असल्याचे आपल्या लक्षात येईल. पोहणे धावणे आणि सायकल चालवणे अशा तीनही स्पर्धांमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी असते. यात ओपन वॉटरमध्ये म्हणजे नदी, तलाव किंवा समुद्रामध्ये  3.8 किमी (2.4 मैल) अंतर पोहायचे असते. स्विमिंगचा पल्ला पार करुन तुम्हाला सायकलिंगला सुरुवात करायची असते. 180.2 किमी (112 मैल) चे अंतर कापायचे असते. 42.2 किमी (26.22 मैल) धावणे याचा समावेश होतो. या तिन्ही गोष्टी 17 तासांच्या आत पूर्ण केल्या तर तुम्ही आयर्न मॅन होता. तु्म्हाला आयर्न मॅनच टायटल दिलं जाते. 

या मोठ्या शर्यतीचा इतिहास काय?

1978 मध्ये जॉन आणि ज्यूडी कॉलिन्स यांनी जगातील सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा असावी, असा विचार केला. धावणे, सायकलिंग किंवा स्विमिंग एकत्रित करुन स्पर्धेच आयोजन केलं. यावेळी पहिल्यांदा 8 स्पर्धेक सहभागी झाले होते. सध्याच्या घडीला ही स्पर्धा 40 हून अधिक देशात भरवली जाते. दक्षिण अमिरिका, उत्तर अमेरिका, युरोप, आशिया , आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या सहा खंडात प्रत्येक वर्षी ही स्पर्धा भरवली जाते. प्रत्येक स्पर्धेत 2000 + स्पर्धेक भाग घेतात. विषेश म्हणजे स्पर्धकांमध्ये पुरुष-महिला बरोबरीने सहभागी असतात. 

डॉक्टर कौस्तुभ राडकर हे पहिले भारतीय आहेत ज्यांनी आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करण्याचा मान मिळवला. यासंदर्भात ते म्हणतात की, 2006 अमेरिकेत शिकत असताना मॅरेथॉनची क्रेझ होती. न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. फिटनेससाठी आव्हानात्मक आणखी काय करता येईल असा विचार डोक्यात घोळत असताना फ्लोरिडातील सहकाऱ्यांनी आयर्न मॅन स्पर्धेसंदर्भात माहिती सांगितली. 2008 मध्ये ज्यावेळी रिसर्च केला तेव्हा भारतातील कोणीच या स्पर्धेत सहभागी झालेले नाही हे लक्षात आले.  एप्रिल 2008 मध्ये स्पर्धेत सहभाग घेतला. त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग घेतला. 
 


​ ​

संबंधित बातम्या