साक्षीबरोबर सराव करताना सोनमच्या डोक्‍याला दुखापत; जखमेवर पाच टाके घालण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

साक्षीला निवड चाचणीत हरवून सोनमने या स्पर्धेसाठी भारताची 62 किलो गटातील अव्वल कुस्तीगीर म्हणून निवड निश्‍चित केली होती.

नवी दिल्ली  : साक्षी मलिकबरोबर सराव करताना डोक्‍याला दुखापत झाल्यामुळे सोनम मलिक रोममधील स्पर्धेत खेळू शकणार नाही. साक्षीला निवड चाचणीत हरवून सोनमने या स्पर्धेसाठी भारताची 62 किलो गटातील अव्वल कुस्तीगीर म्हणून निवड निश्‍चित केली होती. सोनमला आपल्या डोक्‍याला दुखापत झाल्याचे सुरुवातीस समजलेही नाही.

मॅटवर रक्त दिसल्याने दोघींनी एकमेकींना विचारणा केली. हे काही जाणीवपूर्वक घडले नव्हते, असे सोनमचे वैयक्तिक मार्गदर्शक अजमेर मलिक यांनी सांगितले. तिच्या जखमेवर पाच टाके घालण्यात आले आहेत. दुखापत पूर्ण बरी न झाल्याने तिला माघार घ्यावी लागली आहे. तिच्याचबरोबर रवी दहिया (57 किलो), दीपक पुनिया (86 किलो) आणि जितेंदर किन्हा (74 किलो) दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. दीपकला ताप आला आहे, पण त्याला कोरोना झालेला नाही, असेही सांगण्यात आले. 

#SachinUnacademyFilm: अपयशानंतरचे सुंदर यश; प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल

12 वर्षांची असताना सोनमने आखाड्यात पाउल टाकला 

सोनम जेव्हा 12 वर्षांची होती तेव्हा ती एक दिवस आखाड्यात पोहचली. यावेळी ती कोच अजमेर यांना भेटली. त्यानींच सोनमच्या कुटुंबियांना मनवले आणि सोनमच्या कुस्तीचा प्रवास सुरु झाला. सोनमने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा गाडवल्या. रोहतकच्या सोनमचे वडीलही पैलवान होते. पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक आखाड्यात सोनमने आपली छाप सोडली. तिने  अर्जेंटीनामध्ये रंगलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये कास्यं पदकाची कमाई केली होती.  2019 मध्ये आशियाई चॅम्पियनमध्ये तिने रौप्य पदकाची कमाहीई केली. याच वर्षी  बुल्गारियातील कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही बाजी मारली होती. 


​ ​

संबंधित बातम्या