World Cup 2019 : आमचे लक्ष्य फक्त चांगला खेळ करणे : विराट

वृत्तसंस्था
Saturday, 15 June 2019

भारतीय कर्णधार विराटने सांगितले, की मान्य आहे की पाकिस्तानसमोर आम्ही जास्त वेळा खेळलो नसल्याने अंदाज थोडा कमी आहे; पण माझ्याकरिता साधी गोष्ट आहे. कोणताही संघ असो, बलवान वा कमजोर, चांगले क्रिकेट खेळलो तरच आम्ही जिंकू शकतो, तेव्हा सगळे लक्ष फक्त चांगले क्रिकेट खेळण्यावर आहे. 

मॅन्चेस्टर : भारतीय कर्णधार विराटने सांगितले, की मान्य आहे की पाकिस्तानसमोर आम्ही जास्त वेळा खेळलो नसल्याने अंदाज थोडा कमी आहे; पण माझ्याकरिता साधी गोष्ट आहे. कोणताही संघ असो, बलवान वा कमजोर, चांगले क्रिकेट खेळलो तरच आम्ही जिंकू शकतो, तेव्हा सगळे लक्ष फक्त चांगले क्रिकेट खेळण्यावर आहे. 

टीव्ही अन्‌ टीआरपी...

टीव्हीचे लोक भले टीआरपी वाढवायला माझी आणि महंमद आमीरच्या द्वंद्वाची "गोष्ट' करत आहेत. आमच्या संघाकरिता कोणा एका खेळाडूवर लक्ष नसून संपूर्ण संघ महत्त्वाचा आहे. संघातील सर्वांनी भरपूर क्रिकेट मोठ्या स्तरावर खेळले आहे, त्यामुळे मोठ्या सामन्याअगोदर बाहेर काय सुरू आहे याकडे दुर्लक्ष करून आपण काय करायचे याकडे लक्ष केंद्रित कसे करायचे हे सगळ्यांना माहीत आहे. 

सुरवातीच्या आठवणी

2009 मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत युवराजला दुखापत झाली म्हणून अचानक बोलावले होते. पाकविरुद्धच्या सामन्यात काय वातावरण असते याची मला कल्पना नव्हती. मी खराब फटका मारून बाद झालो होतो आणि रात्रभर पश्‍चात्तापाने छताकडे बघत होतो. तो माझ्याकरिता खराब प्रसंग होता. 2011च्या उपांत्य सामन्यात मोहालीला फलंदाजी करताना वहाब रियाझ आणि शाहीद आफ्रिदी यांच्याशी झडलेली चकमक दरम्यान जी बोलाचाली झाली होती त्याची आठवण येताच आजही हसायला येते. 

पासमुळे पेच... 

पाकिस्तान समोरच्या सामन्यात इतके मित्र यायच्या विचारात असतात की पासेस आणि तिकिटांची जुळवाजुळव करणे खरेच कठीण होते. मला शेवटी एकच सांगायचे आहे ते म्हणजे हा एक क्रिकेट सामना आहे हे चाहत्यांनी लक्षात ठेवावे आणि क्रिकेटचा आनंद घ्यावा.


​ ​

संबंधित बातम्या