World Cup 2019 : पाकिस्तानने केली 46 वर्षांतली खराब कामगिरी

वृत्तसंस्था
Saturday, 1 June 2019

-पाकिस्तानची सलग 11वी हार. 46 वर्षांतील सर्वांत खराब कामगिरी 
- 2015च्या मागील स्पर्धेत 21 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध 310 धावांच्या आव्हानासमोर पाकची 160 धावांत शरणागती. त्या वेळी 4 बाद 1 अशी दुरवस्था

वर्ल्ड कप 2019 :

- पाकिस्तानची सलग 11वी हार. 46 वर्षांतील सर्वांत खराब कामगिरी 
- 2015च्या मागील स्पर्धेत 21 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध 310 धावांच्या आव्हानासमोर पाकची 160 धावांत शरणागती. त्या वेळी 4 बाद 1 अशी दुरवस्था 
- पाक संघ सलामीच्या लढतीआधी 38 दिवस इंग्लंडमध्ये दाखल 
- पाक संघाचा डाव जेमतेम 111 मिनिटे चालला. क्रिकेटमध्ये 111 आकडा अशुभ मानला जातो. त्यास "नेल्सन' असे संबोधले जाते 
- विश्वकरंडकातील दुसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या 
- 1992च्या स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध 74 धावांत गारद 
- स्पर्धेच्या इतिहासातील 21व्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या 
- या स्पर्धेतील सहभागी संघांच्या कामगिरीचा निकष लावल्यास आठव्या क्रमांकाचा नीचांक 
- विश्वकरंडकात पाकचा डाव सर्वांत कमी षटकांत संपुष्टात. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1992च्या स्पर्धेत 40.2 षटकांत 74 धावांत बाद 
- वन-डे इतिहासातील सर्वांत कमी षटकांत डाव संपण्याचा दुसऱ्या क्रमांकाचा नीचांक. 1993 मध्ये केपटाऊनला तिरंगी स्पर्धेत वेस्ट इंडीजविरुद्ध 19.5 षटकांत 43 धावांत डाव आटोपला 
- सहा स्पर्धांत चौथ्यांदा पाकची सलामी विंडीजशी. यात तिसरी हार. 
- ट्रेंटब्रिज मैदानावरील दुसऱ्या क्रमांकाचा नीचांक. 2008 मध्ये इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या 83 धावा 
- विंडीजचे 53 टक्के चेंडू आखूड टप्प्याचे. सरासरी वेग 133, जो यंदाचा सर्वाधिक 
- ख्रिस गेलचे 121 झेल. विंडीजतर्फे सर्वाधिक 120 झेलांचा कार्ल हूपरचा उच्चांक मागे टाकला 


​ ​

संबंधित बातम्या