पाकिस्तान हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेपासून दूर 

वृत्तसंस्था
Tuesday, 29 October 2019

तीनवेळचे ऑलिंपिक चॅंपियन पाकिस्तान पुरुष हॉकी संघाला टोकियो ऑलिंपिक मात्र गाठता आले नाही. ऑलिंपिक पात्रता हॉकी स्पर्धेतील अपयशामुळे त्यांच्यावर ही नामुष्की आली. 

ऍमस्टरडॅम : तीनवेळचे ऑलिंपिक चॅंपियन पाकिस्तान पुरुष हॉकी संघाला टोकियो ऑलिंपिक मात्र गाठता आले नाही. ऑलिंपिक पात्रता हॉकी स्पर्धेतील अपयशामुळे त्यांच्यावर ही नामुष्की आली. 

ट्रेनिंगला सुरवात करत बुमरा म्हणतोय Coming Soon 

पहिल्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागलेल्या नेदरलॅंड्‌स संघाने पाकिस्तानवर 6-1 असा विजय मिळविला. कमालीचा आक्रमक खेळ करणाऱ्या नेदरलॅंड्‌स संघाने पाकिस्तानवरील विजयाने आपला गोलफरक 10-5 असा भक्कम राहिल याची काळजी घेतली. 

मिंक व्हॅन वीर्डनचे दोन गोल आणि बियॉर्न केलेर्मन, मायक्रो प्रुईसेर यांचा एकेक गोल याच्याजोरावर त्यांनी विश्रांतीला 4-0 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात टेरेन्स पीटर्स आणि जीप जान्सेन यांनी आणखी दोन गोल नोंदवून संघाची आघाडी भक्कम केली. अर्थात, या सत्रात त्यांना 53व्या मिनिटाला एक गोल स्विकारावा लागला. पाकिस्तानचा एकमात्र गोल रिझवान अली याने नोंदविला. 

पाकिस्तानने 1960, 1968, 1984 ऑलिंपिक स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. पण, त्यानंतर त्यांच्या कामगिरीला उतरती कळा लागली. त्यांनी 1992 मध्ये बार्सिलोना येथील स्पर्धेत अखेरचे ब्रॉंझपदक मिळविले. तेव्हापासून पदकानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. 

गांगुलींचे खेळाडूंना दिवाळी गिफ्ट; मिळणार बक्कळ मानधन

पाकिस्तानचा खेळाडू रिझवान मेहमूद याने ऑलिंपिक पात्रता सिद्ध करू न शकल्याबद्दल निराशा व्यक्त केली. तो म्हणाला,"ऑलिंपिक पात्रता सिद्ध करू शकलो नाही, हा आमच्यासाठी खराब दिवस आहे. पहिला सामना आम्ही चांगाल खेळलो. पण, दुसऱ्या सामन्यात आम्हाला त्यांच्या खेळाची बरोबरी करता आली नाही. आमच्याकडून अनेक चुका झाल्या आणि त्याचा फायदा नेदरलॅंड्‌स संघाने अचूक उठवला. त्यांचा बचाव अभेद्य होता. त्यापेक्षा त्यांच्या वेगाचा सामना आम्हाला करता आला नाही.''  


​ ​

संबंधित बातम्या