डेव्हिस करंडक कडेकोट सुरक्षेची पाकिस्तानची हमी 

वृत्तसंस्था
Thursday, 1 August 2019

डेव्हिस करंडक लढतीसाठी भारतीय संघाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल असा विश्‍वास पाकिस्तान टेनिस महासंघाचे सचिव निवृत्त कर्नल रेहमान गुल यांनी व्यक्त केला आहे. 

लाहोर -  डेव्हिस करंडक लढतीसाठी भारतीय संघाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल असा विश्‍वास पाकिस्तान टेनिस महासंघाचे सचिव निवृत्त कर्नल रेहमान गुल यांनी व्यक्त केला आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार महेश भूपती याने खेळाडूंच्या सुरक्षेविषयी विचारणा केली होती. त्यानंतर गुल यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले,""जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करता, तेव्हा सगळी व्यवस्था चोख ठेवली जाते. तयारी असल्याशिवाय स्पर्धेची जबाबदारीच घेता येत नाही. आम्ही सर्व तयारीसह या लढतीचे आयोजन करणार आहोत.'' 

आयटीएफच्या पदाधिकाऱ्यांनी देखील लढत होणाऱ्या इस्लामाबाद केंद्राची पाहणी केली असून, त्यांनी सुरक्षा व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केले होते. त्याच वेळी भारतीय संघ येथे येण्यास आता हरकत नसावी अशी पुष्टी देखील जोडली होती.


​ ​

संबंधित बातम्या