पाकिस्तानी क्रिकेटपटूची मुलींसोबत चॅटिंग; स्क्रीनशॉट झाले व्हायरल

वृत्तसंस्था
Wednesday, 24 July 2019

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, हे चॅट गेल्या सहा महिन्यांमधील आहेत. त्यानंतर या काळात आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा 2019 देखील पार पडली.

पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाम-उल-हक अनेक मुलींना फसवत असल्याचे प्रकरण आज (बुधवार) सोशल मीडियातून उघडकीस आले. एका ट्विटर युजरने इमामशी केलेले व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट ट्विटरवरून प्रसिद्ध केल्याने इमाम तमाम नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला. इमामने आपल्या स्टारडमचा चुकीचा वापर केला, असे फसवणूक झालेल्या तरुणींचे म्हणणे आहे. 

एका ट्विटर वापरकर्त्याने इमामसह चॅट करणाऱ्या मुलींचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, हे चॅट गेल्या सहा महिन्यांमधील आहेत. त्यानंतर या काळात आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा 2019 देखील पार पडली.

यावर पाकिस्तानी चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, काही मुलींनी इमामला फसवण्यासाठी असे वर्तन केले आहे. तर काहीजणांनी हे प्रकरण गंभीर असून याची तुलना #MeToo शी केली आहे.


​ ​

संबंधित बातम्या