World Cup 2019: मँचेस्टरमध्येही पांढऱ्या तांबड्या रस्याची चर्चा

वृत्तसंस्था
Monday, 8 July 2019

भारताने वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून सध्या हा चर्चेचा विषय आहे. पण यापेक्षा वेगळे म्हणजे सध्या मँचेस्टरमध्ये कोल्हापूरच्या तांबड्या रस्याची जोरदार चर्चा आहे.

वर्ल्ड कप 2019 :
मँचेस्टर:
भारताने वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून सध्या हा चर्चेचा विषय आहे. पण यापेक्षा वेगळे म्हणजे सध्या मँचेस्टरमध्ये कोल्हापूरच्या तांबड्या रस्याची जोरदार चर्चा आहे. 

मुंबईचे रहिवाशी असणाऱ्या रोहित देवांग नावाच्या माणसाने आपल्या प्रदीप नावाच्या एका सहकाऱ्यासह मँचेस्टरमध्ये रेस्टॉरंट चालू केले आहे. या रेस्टॉरंटमध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रकारचे पदार्थ मिळतात. या हॉटेलातील शेफ हा महाराष्ट्रीयन असल्याने खूप सारे महाराष्ट्रीय लोक येथे भेट देत असतात, असे हॉटेल मालक देवांग यांनी सांगितले.

तांबड्या रस्स्यासोबतच या हॉटेलमध्ये पनीर टिक्का, शाबुदाणावडा असे महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात. मँचेस्टरला जेव्हा भारतातून काही मित्र मॅच पाहण्यासाठी किंवा कामानिमीत्त येतात तेव्हा आम्ही त्यांना याच हॉटेलमध्ये जेवायला घेऊन येतो, असे इथले ग्राहक आवर्जून सांगतात.

​ ​

संबंधित बातम्या