तेलुगूचे अपयश कायम; तेलुगूचा घरच्या मैदानावर चौथा पराभव
Friday, 26 July 2019
घरच्या मैदानावर तेलुगूचे अपयश अखेरच्या सामन्यातही कायम राहिले. त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. त्यांचे आधारस्तंभ मानले जाणारे सुरुज आणि सिद्धार्थ देसाई बंधू यांना आजही लय गवसली नाही.
प्रो कबड्डी
हैद्राबाद : घरच्या मैदानावर तेलुगूचे अपयश अखेरच्या सामन्यातही कायम राहिले. त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. त्यांचे आधारस्तंभ मानले जाणारे सुरुज आणि सिद्धार्थ देसाई बंधू यांना आजही लय गवसली नाही.
जयदीप, हादी आणि मोनू यांच्या बचावातील अचकू कामगिरीने पाटणाचा विजय साकार झाला. पूर्वार्धात प्रदीप नरवालच्या चढायांनी पाटणाला आघाडीवर नेले आणि उत्तरार्धात त्यांच्या बचावाने पाटणाची बाजू भक्कम केली. पाटणाने 34-22 असा विजय मिळविला.