World Cup 2019 : धोनी बाद झाल्यावर तो फोटोग्राफर रडलाच नाही; खोटा फोटो व्हायरल

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019
विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी बाद झाल्यावर फोटोग्राफर रडलेला फोटो व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या कोलाज फोटोत धोनी बाद झाल्यानंतर फोटो काढताना फोटोग्राफरही रडला. मात्र, तो फोटो भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील नसल्याचे सिद्ध झाले आहे

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी बाद झाल्यावर फोटोग्राफर रडलेला फोटो व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या कोलाज फोटोत धोनी बाद झाल्यानंतर फोटो काढताना फोटोग्राफरही रडला. मात्र, तो फोटो भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील नसल्याचे सिद्ध झाले आहे. रडणाऱ्या फोटोग्राफरचा तो फोटो जानेवारी महिन्यात झालेल्या आशियाई फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेतील आहे. या फोटोग्राफरचे नाव अल-अजावी असून तो इराकचा नागरिक आहे.

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्यफेरीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने चांगली झुंज दिली. हा सामना कदाचित त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो. त्यामुळेच तो धावबाद झाला तेव्हा चाहते खूप भावनिक झाले होते.

सामन्यात धोनी जेव्हा बाद झाला तेव्हा तो स्वत: खूप भावनिक झाला होता. आपल्या हिरोला रडताना पाहून त्याच्या अनेक चाहत्यांना अश्रू अनावर झाले होते.


​ ​

संबंधित बातम्या