युरोपीयन क्रिकेट लीग : या खेळाडूने अवघ्या 28 चेंडूत झळकावलं शतक!

वृत्तसंस्था
Thursday, 1 August 2019

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करताना 2013च्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 30 चेंडूत शतक केले होते.​

युरोपीयन क्रिकेट लीगच्या टी-10 लीगमध्ये अहमद नबी या फलंदाजाने डोळ्यांचे पारणे फेडणारी खेळी साकारली. चौकार-षटकारांची आतषबाजी करत पहिल्या शतकवीराचा मान पटकावला. ड्रॅक्स क्रिकेट क्लबच्या या फलंदाजाने 28 चेंडूंत शतकी खेळी केली. यावेळी त्याने 14 षटकारांची आतिषबाजी केली.

टी10 फॉरमॅटला अद्याप मान्यता मिळालेली नसली तरी सध्या या फॉरमॅटची चर्चा आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करताना 2013च्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 30 चेंडूत शतक केले होते. त्यानंतर क्लब क्रिकेटमध्ये भारताच्या वृद्धीमान सहाने 20 चेंडूत शतक केले आहे. त्या 14 षटकार व 4 चौकारांचा समावेश होता.

अहमद नबीच्या शतकी खेळीच्या बळावर ड्रॅक्स क्रिकेट क्लबने निर्धारित दहा षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 164 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरलेल्या क्लज क्रिकेट क्लबला दहा षटकांत पाच बाद 69 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना ड्रॅक्स क्रिकेट क्लबने 95 धावांनी जिंकला. तडाखेबाज फलंदाजी केल्यामुळे नबीला सामनाविराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.


​ ​

संबंधित बातम्या