'पॉकेट रॉकेट' शेलीने मोडला 40 वर्षे जुना विक्रम

वृत्तसंस्था
Saturday, 10 August 2019

"पॉकेट रॉकेट' या टोपण नावासोबतच आपल्या वैविध्यपूर्ण केशरचनेमुळे आपले वेगळेपण निर्माण करणाऱ्या जमैकाच्या शेली ऍन फ्रेझर-प्रेसी हिने पॅन अमेरिकन स्पर्धेतील ऍथलेटिक्‍समध्ये महिलांच्या दोनशे मीटर शर्यतीत 40 वर्षे जुना स्पर्धा विक्रम इतिहास जमा केला.

लिमा : "पॉकेट रॉकेट' या टोपण नावासोबतच आपल्या वैविध्यपूर्ण केशरचनेमुळे आपले वेगळेपण निर्माण करणाऱ्या जमैकाच्या शेली ऍन फ्रेझर-प्रेसी हिने पॅन अमेरिकन स्पर्धेतील ऍथलेटिक्‍समध्ये महिलांच्या दोनशे मीटर शर्यतीत 40 वर्षे जुना स्पर्धा विक्रम इतिहास जमा केला. या कामगिरीमुळे ती पुढील महिन्यात दोहा येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेत ती संभाव्या विजेत्यांमध्ये आली आहे. 

दोन वर्षापूर्वी मुलाला जन्म देणाऱ्या 32 वर्षीय शेलीने 22.43 सेकंदात शर्यत जिंकताना 1979 च्या सॅन जुआन (प्युर्टो रिको) स्पर्धेत अमेरिकेच्या एव्हलिन ऍश्‍फोर्डने नोंदविलेला 22.45 सेदंकाचा स्पर्धा विक्रम मोडित काढला. ब्राझीलच्या विटोरिया रोसने 22.62 सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह रौप्य तर बहामाच्या तानिया गैथरने 22.76 सेकंदासह ब्रॉंझपदक जिंकले. सर्वकालीन महान धावपटूत गणना करण्यात आलेल्या शेलीने 40 वर्षे जुना विक्रम मोडित काढला असला तरी यंदा तिने जमैकाच्या राष्ट्रीय स्पर्धेत नोंदविलेली 22.22 सेकंद ही तिची यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम वेळ आहे.

ही वेळ सध्या कामगिरीनुसार जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. पॅन अमेरिकन स्पर्धेत शंभर मीटर शर्यत जिंकणारी एलेन थॉम्पसन ही सध्या क्रमवारीत आघाडीवर आहे.


​ ​

संबंधित बातम्या