Ranji Trophy 2019 : पृथ्वीचं नाणं खणखणीतच; झळकाविले शानदार शतक
भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने रणजी करंडकात पुनरागमन करताच शानदार शतक झळकाविले आहे. त्याने पहिल्या डावातही आक्रमक फलंदाजी करत 66 धावा केल्या होत्या मात्र, त्याचे शतक हुकले होते.
मुंबई : भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने रणजी करंडकात पुनरागमन करताच शानदार शतक झळकाविले आहे. त्याने पहिल्या डावातही आक्रमक फलंदाजी करत 66 धावा केल्या होत्या मात्र, त्याचे शतक हुकले होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप
बडोद्याविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात त्याने 84 चेंडूंमध्ये शानदार शतक झळकाविले. तो सध्या 113 चेंडूंमध्ये तो 122 धावांवर खेळत आहे. त्याने या खेळीत 12 चौकार आणि चार षटकार खेचले आहेत. त्याने 107.96च्या सरासरीने धावा केल्या.
Virushka Anniversary : सर्वांचा विरोध झुगारत अशी फुलली विरुष्काची लव्हस्टोरी
मुंबईच्या सध्या 190 धावा झालेल्या आहेत. मुंबईकडे सध्या 314 धावांचे लीड आहे. आता मुंबईचा संघ कदाचित डाव घोषित करण्याची शक्यता आहे आणि बडोदाला मोठे आव्हान देण्याची शक्यता आहे. मुंबईने मोसमाची जोरदार सुरवात केली असताना पृथ्वी शॉनेही दोन्ही डावात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच फेब्रुवारीमध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामध्ये कसोटी मालिकेमध्ये पृथ्वीला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.